मागील काही काळापासून भारतीय संघातील काही खेळाडू खराब फॉर्मचा सामना करत आहेत. त्यामध्ये कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुल याच्या नावाचाही समावेश आहे. राहुल मागील काही काळापासून धावांचा पाऊस पाडण्यात कमी पडताना दिसत आहे. नागपूर कसोटीत भारताच्या पहिल्या डावादरम्यानही राहुलने खूपच संथ फलंदाजी केली. तसेच, तो लवकर तंबूतही परतला. त्याच्या या खेळीमुळे संघातील त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मात्र, त्याच्या जागेविषयी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचे मत जरा वेगळे आहे.
मागील वर्षी बांगलादेश दौऱ्यावरील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत केएल राहुल (KL Rahul) याची बॅट शांतच होती. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून त्याला लग्नासाठी ब्रेक देण्यात आला होता. यादरम्यान युवा फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) याने शानदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सलामीला खेळवण्याची मागणीदेखील केली जात होती. तरीही संघ व्यवस्थापनाने राहुलवर विश्वास ठेवला. मात्र, राहुलने विश्वासाला तडा दिला. त्याने भारताच्या पहिल्या डावादरम्यान 71 चेंडूंचा सामना करताना 1 चौकाराच्या मदतीने फक्त 20 धावा केल्या. तसेच, टॉड मर्फी (Todd Murphy) याच्या चेंडूवर त्यालाच झेल देऊन बाद झाला.
विक्रम राठोड यांनी केले राहुलचे समर्थन
भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी राहुलच्या चांगल्या कामगिरीसाठी त्याचे समर्थन केले आहे. तसेच, त्याच्या मागील काही चांगल्या खेळींचा उल्लेखही केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना विक्रम राठोड म्हणाले की, “केएलसाठी प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर त्याने खेळलेल्या मागील 10 कसोटी डावांमध्ये, त्याच्या नावावर काही शतके आणि दोन अर्धशतके आहेत. त्याने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये शतक ठोकले आहे. मला वाटत नाही की, अंतिम अकरामधील त्याच्या जागेवर प्रश्न उपस्थित करण्याच्या स्थितीत आहोत.”
खरं तर, केएल राहुल याने मागील 10 कसोटी डावात 1 शतक आणि 1 अर्धशतक केले आहे. त्याने 2021च्या शेवटी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे शतक ठोकले होते. तसेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच त्याने पुढील सामन्यात शतक केले होते. त्यानंतर राहुलने कोणतीही मोठी खेळी साकारली नाहीये. मागील 8 डावांमध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या 23 राहिली आहे. (ind vs aus 2023 vikram rathour on indian vice captain kl rahul read what he said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताने नागपुरात वापरली 2017ची रणनीती, ‘हे’ तीन धुरंधर नेहमीच वाजवतात विरोधी संघाची बँड; एकदा वाचाच
मोठी बातमी! तब्बल 40 दिवसांनंतर स्वत:च्या पायावर उभा राहिला पंत, फोटोसोबत लिहिले मन जिंकणारे कॅप्शन