भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान १७ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी) मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मालिके आधी भारत आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात दोन सराव सामने झाले. हे दोन्ही सराव सामने अनिर्णित राहिले असले तरी, यात भारतीय संघाने सरस खेळ केला. सिडनी येथे संपन्न झालेल्या दुसऱ्या तीनदिवसीय दिवस-रात्र सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने काहीशी सुमार कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया अ संघाच्या या कामगिरीवर ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज कर्णधार ऍलन बॉर्डर यांनी सडकून टीका केली.
ऑस्ट्रेलिया अ संघ अत्यंत लाजीरवाण्या पद्धतीने खेळला
ऑस्ट्रेलिया अ व भारत यांच्यादरम्यान सिडनी येथे काल दुसरा तीनदिवसीय दिवस-रात्र सराव सामना बरोबरीत सुटला. भारतीय संघाने या सामन्यातील पहिले दोन दिवस एकहाती वर्चस्व गाजवले. मात्र, अखेरच्या दिवशी बेन मॅकडरमॉट व जॅक वेदराल्ड यांनी शतक झळकावत सामना अनिर्णित राखला. याच सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळानंतर, ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज कर्णधार ऍलन बॉर्डर यांनी फॉक्स स्पोर्टसला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बॉर्डर म्हणाले,
“मी यापूर्वी मी काय कधीही कोणत्याही ऑस्ट्रेलियन संघाकडून इतका निराशाजनक खेळ पाहिला नाही. दुसऱ्या दिवशीचे अखेरचे सत्र ऑस्ट्रेलिया अ संघाने अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीने खेळणे. हा ऑस्ट्रेलिया अ संघ आहे. यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतात किंवा राष्ट्रीय संघात जागा मिळण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, आज त्यांनी अत्यंत खराब खेळ केला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण किती विभागात भारताने त्यांना पछाडले. कर्णधारपद भूषवणार्या ॲलेक्स केरीला अजून खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.”
विहारी-पंत यांची दमदार फलंदाजी
प्रकाशझोतात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात भारतीय फलंदाजांनी तब्बल १७० धावा काढल्या होत्या. भारताकडून मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारी व यष्टीरक्षक रिषभ पंत यांनी शतके ठोकली. दिवसातील अखेरच्या षटकात पंतने २२ धावा काढत अखेरच्या चेंडूवर शतक पूर्ण केले होते.