---Advertisement---

स्टार भारतीय क्रिकेटपटूची राजकारणात एंट्री, या पक्षाची सदस्यता स्वीकारली

On: गुरूवार, सप्टेंबर 5, 2024 1:25 PM
Ravindra-Jadeja
---Advertisement---

टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानं राजकारणात प्रवेश केला आहे. त्यानं भारतीय जनता पक्षाची सदस्यता स्वीकारली. रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा गुजरातच्या जामनगरमधून भाजपाची आमदार आहे. तिनं नुकतीच रवींद्र जडेजाच्या भाजपा सदस्यत्वाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. रिवाबानं एका पोस्टद्वारे सांगितलं की, रवींद्र जडेजानं भाजपाचं सदस्यत्व घेतलं आहे. जडेजानं अलीकडेच 2024 च्या टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती जाहीर केली होती.

विशेष म्हणजे, रवींद्र जडेजानं पत्नी रिवाबासाठी अनेकदा प्रचार केला आहे. निवडणुकीदरम्यान तो पत्नी सोबत भाजपाचा प्रचार करताना दिसला होता. याशिवाय त्यानं अनेक रोड शो देखील केले आहेत. रिवाबा जडेजा गुजरातच्या जामनगर उत्तर मतदारसंघातून आमदार आहे. आता रवींद्र जडेजानंही भाजपाचं सदस्यत्व घेऊन राजकारणात एंट्री केली.

रिवाबानं ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सांगितलं की, रवींद्र जडेजा भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्य बनला आहे. टी20 विश्वचषकानंतर रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

रवींद्र जडेजानं भारतीय संघाची बरीच वर्ष सेवा केली. टीम इंडियासाठी त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. जडेजाचा आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड चांगला आहे. त्यानं 2024 टी20 विश्वचषकानंतर टी20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. जडेजानं भारतासाठी 74 टी20 सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 515 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्यानं 54 विकेट्सही घेतल्या आहेत. 15 धावांत ३ बळी ही त्याची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. रवींद्र जडेजानं टी20 मधून निवृत्ती घेतली असली, तरी तो भारताकडून एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळत राहणार आहे.

 

हेही वाचा – 

टीम इंडिया सावध राहा, बांगलादेश देऊ शकतो ‘जोर का झटका’!
काय सांगता! संपूर्ण संघ 10 रन्सवर ऑलआऊट, अवघ्या 5 चेंडूत संपला सामना!
टी20 विश्वात खळबळ; 320 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत या खेळाडूने रचला विश्वविक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---