भारतीय संघ आणि क्रिकेटचे चाहते सध्या कदाचित ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक कुणाला मिस करत असतील, तर तो खेळाडू म्हणजे अष्टपैलू रवींद्र जडेजा होय. टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. त्यात जडेजाचा समावेश नाहीये. हा संघ दोन आठवड्यापूर्वीच ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. मात्र, विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर जडेजाचा एक व्हिडिओ सध्या माध्यमांचे लक्ष वेधत आहे. हा व्हिडिओ जडेजाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये तो दुखापतीतून बरा होण्यासाठी पाऊले टाकताना दिसत आहे.
भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने सर्जरीनंतर बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो धावण्याचा सराव करताना दिसत आहे. तसेच, तो संघात परतण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहे. या व्हिडिओत तो एका जिममध्ये जॉगिंग करताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही खुश झाल्याचे दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.
काहीजण तो लवकर बरा होऊन संघात परतण्याची प्रार्थना करत आहेत. तसेच, काहीजण त्याच्या आणि सीएसकेमध्ये काहीतरी बिनसल्याच्या बातम्यांवरही प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “जडेजा चेन्नई सुपर किंग्समधूनही पळत आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “मला या ट्वीटचा अर्थ समजला. एक दिवस पळता-पळता मी सीएसकेमधूनही पळून जाईल.”
https://twitter.com/imjadeja/status/1582669996119162880?s=20&t=aitxaEcTN4fXlyGI8yfaoQ
जडेजा आणि सीएसकेमधील वाद?
मागील काही काळापासून अशा बातम्या येत आहेत की, जडेजा आणि सीएसकेमध्ये काहीतरी बिनसलं आहे. माध्यमातील वृत्तानुसार, पुढील काही दिवसांमध्ये जडेजा सीएसकेमध्ये राहणार की नाही, हे स्पष्ट होईल. या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे की, सीएसके संघ व्यवस्थापन एक आठवड्याच्या आत जडेजाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतील. यानंतर जर जडेजाशी संपर्क झाला नाही, तर त्याला लिलावापूर्वी रिलीझ करण्यात येईल.
जडेजाच्या शेवटच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 31 ऑगस्ट रोजी दुबईत हाँगकाँगविरुद्ध टी20 सामना खेळला होता. तेव्हापासून तो संघातून बाहेरच आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खूप होत आहे टीका, पण सुरेश रैना म्हणतोय, “त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्याच”
आता काय करायचं? एकाच दिवसात श्रीलंकेचे दोन खेळाडू विश्वचषकातून बाहेर; तिसराही त्याच वाटेवर






