---Advertisement---

अल्लू अर्जुनने वॉर्नरला दिल्या हटके शुभेच्छा; इन्स्टा स्टोरी शेअर करत म्हणाला, ‘क्रिकेटच्या…’

Allu Arjun David Warner
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर अल्लू अर्जुनचा किती मोठा चाहता आहे हे कोणापासून लपून राहिलेले नाही. वॉर्नर अनेकदा मैदानावर अल्लू अर्जुन याच्या लोकप्रिय पुष्पा चित्रपटाच्या पोजची कॉपी करताना दिसतो. दरम्यान, दक्षिणेच्या दिग्गज सुपरस्टारने कांगारू संघाच्या या स्फोटक फलंदाजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) आज त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अनेक चाहते आणि सहकारी खेळाडू त्याला शुभेच्छा देत आहेत. अल्लू अर्जुन (Allu Arjun) याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या खास चाहत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक स्टोरीही शेअर केली आहे. त्याने वॉर्नरचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले, “क्रिकेटच्या सुपरस्टारला खूप साऱ्या शुभेच्छा. तुला जे पाहिजे ते मिळो.”

वॉर्नरचे हैदराबादशी खास नातं आहे. आयपीएलमध्ये तो बराच काळ सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. तो सध्या दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असला तरी हैदराबादमधील चाहते त्याला खूप पाठिंबा देतात. अलीकडेच, वॉर्नरने अल्लू अर्जुनचे ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन केले होते.

ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज विश्वचषकात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. वॉर्नरने या स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांमध्ये 66.40 च्या अप्रतिम सरासरीने 332 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. या दरम्यान 163 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. या दिग्गज फलंदाजाची शानदार कामगिरी या स्पर्धेत कायम राहील, अशी त्याच्या सर्व चाहत्यांना पूर्ण आशा आहे.

ऑस्ट्रेलिया संघाला पुढील सामना 28 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरूद्ध खेळायचा आहे. ऑस्ट्रेलिया संघाने या विश्वचषकात आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत त्यातील 3 सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. (Allu Arjun best wishes to Warner Sharing an Insta story)

म्हत्वाच्या बातम्या

चेपॉकवर पाकिस्तान सर्वबाद, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ‘इतक्या’ धावांची आवश्यकता

इंग्लंड संघाबाबत वीरेंद्र सेहवागचं धक्कादायक विधान; म्हणाला, ‘इंग्लंडचा संघ अतिशय…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---