पुणे, 16 जुलै, 2023: कुंटे चेस अकादमी यांच्या वतीने आयोजित पहिल्या केसीए पुणे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीअखेर 12 वर्षाखालील गटात अलौकिक सिन्हा, आरव धायगुडे यांनी, तर खुल्या गटात प्रथमेश शेरला, श्लोक शरणार्थी या खेळाडूंनी 5गुणांसह संयुक्तरीत्या आघाडी प्राप्त केली आहे.
श्री गणेश सभागृह, कर्वेरोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पाचव्या फेरीत 12 वर्षाखालील गटात अलौकिक सिन्हाने शर्विन बडवेचा पराभव करून 5गुण मिळवले. तर, आरव धायगुडेने परम जालनला पराभुत करून 5गुण प्राप्त केले.
खुल्या गटात प्रथमेश शेरलाने निर्गुण केवलला नमवित 5गुणांची कमाई केली. श्लोक शरणार्थीने निशांत जवळकरवर विजय मिळवत 5गुण मिळवले. याआधी स्पर्धेचे उद्घाटन ग्रँड मास्टर व मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेते अभिजीत कुंटे, पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेच्या संचालिका मृणालिनी कुंटे, अभिषेक केळकर, चीफ आरबीटर नितीन शेणवी आदी मान्यवर उपस्थित होते. (Aloik Sinha, Aarav Dhaygude, Prathamesh Sherla, Shlok Refugee jointly lead at the end of the fifth round of the KCA Pune Open Chess Tournament.)
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पाचवी फेरी: 12 वर्षाखालील गट:
शर्विन बडवे (4गुण) पराभुत वि. अलौकिक सिन्हा (5गुण);
आरव धायगुडे (5गुण) वि.वि.परम जालन(4गुण);
सृजन बोरकर (4गुण) बरोबरी वि. सई पाटील(4गुण);
अद्वैय बेंडे (4.5गुण) वि.वि.वेदांत काळे (3.5गुण);
ईशान अर्जुन पीवाय (3.5गुण) बरोबरी वि.ओवी पावडे (3.5गुण);
आर्ग्य देशमुख(3गुण) पराभुत वि. राघव पावडे (4गुण);
अभिजय वाळवेकर (4गुण) वि.वि.अर्णव कांगो (3गुण);
आरीव कामत (3गुण) पराभुत वि. शौर्य घेलाणी (4गुण);
सर्वज्ञ बालगुडे (3गुण) पराभुत वि. श्रीयांश पाटील (4गुण);
धवल लोंढे (4गुण) वि.वि.सोहम गोखले(3गुण);
खुला गट:
प्रथमेश शेरला(5गुण) वि.वि.निर्गुण केवल (4गुण);
निशांत जवळकर (4गुण) पराभुत वि. श्लोक शरणार्थी (5गुण);
हितांश जैन (4गुण) बरोबरी वि. अक्षज पाटील(4गुण);
आर्यन सिंगला (4गुण) वि.वि.ओजस देशतवार (3.5गुण);
आरूष डोळस (3गुण) पराभुत वि. विरेश शरणार्थी (4गुण);
आदिती कयाळ (3गुण) पराभुत वि. श्लोक माळी (4गुण);
मिहिर सरवदे (4गुण) वि.वि.तनिश गुप्ता (3गुण);
उदय मुद्रा (3गुण) पराभुत वि. आदित्य जोशी(4गुण);
अविरत चौहान (4गुण) वि.वि.युग सोनिग्रा (3गुण).
महत्वाच्या बातम्या –
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ च्या रोमांचक सामन्यांचा आनंद घेतला
बेअरस्टोच्या विवादित स्टंपिंगवर ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला, ‘मी आधीही असं…’