कोरोनामध्ये अनेक महिने क्रिकेटचे सामने झाले नाहीत. मात्र, हळूहळू गोष्टी सामान्य झाल्या. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून क्रिकेटच्या प्रत्येक फाॅरमॅटचे आयोजन केले जाऊ लागले. तेव्हापासून भारतीय संघ सतत खेळत आहे. या संघानं यंदाच्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद देखील पटकावले. या बातमीद्वारे आपण 2020च्या दशकातील भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टाॅप 5 खेळाडूंची नावे पाहणार आहोत.
रोहित शर्मा (Rohit Sharma)- भारतीय कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) 2020 पासून भारतासाठी 126 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आपल्या 146 डावांमध्ये भारतीय कर्णधारानं 5,516 धावा केल्या आहेत. त्यानं 10 शतक आणि 34 अर्धशतकं ठोकली आहेत. रोहित शर्मान (Rohit Sharma) 210 षटकार देखील ठोकले आहेत. यादरम्यान त्याची सर्वाधिक धावसंख्या 161 धावा आहे.
विराट कोहली (Virat Kohli)- या यादीत विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दशकात विराटनं रोहित शर्मापेक्षा (Rohit Sharma) जास्त डावात फलंदाजी केली आहे. विराटनं 147 डावात 5,498 धावा केल्या आहेत. विराटनंही रोहित शर्माइतकीच 10 शतकं झळकावली आहेत. 2024च्या टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये कोहलीनं उत्कृष्ट फलंदाजी केली.
शुबमन गिल (Shubman Gill)- भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल (Shubman Gil) याला या दशकात खेळण्याची सतत संधी मिळाली आहे. त्याच्या बॅटमधूनही खूप धावा झाल्या आहेत. गिल आता भारतीय संघाचा उपकर्णधारही झाला आहे. गिलने 91 सामन्यांच्या 112 डावात 4,382 धावा केल्या आहेत. या दशकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.
केएल राहुल (KL Rahul)- या दशकात केएल राहुलनं (KL Rahul) भारतासाठी 103 सामने खेळले आहेत. तो सतत संघात आणि बाहेर असतो. राहुलनं 110 डावांमध्ये फलंदाजी केली. त्यामध्ये त्यानं 3,946 धावा केल्या आहेत. राहुल सध्या टी20 संघातून वगळला गेला असला तरी तो एकदिवसीय आणि कसोटीत खेळत आहे.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)- श्रेयस अय्यरसाठी (Shreyas Iyer) मागील काही काळ चांगला राहिलेला नाही. तो बीसीसीआयच्या करारातून बाहेर राहिला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कमबॅक मालिकेतही तो अपयशी ठरला. मात्र, त्याआधी त्यानं भारतासाठी शानदार फलंदाजी केली होती. अय्यरनं 105 डावात फलंदाजी करताना 94च्या स्ट्राईक रेटने आणि 41 च्या सरासरीने 3,634 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“मला भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळायचं आहे”, सूर्यकुमार यादवने बोलून दाखवली खदखद
3 मोठी कारणं, ज्यामुळे मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करेल
शिवानी पवारला डावलून विनेशला ऑलिम्पिकला पाठविले; कुस्तीपटूचे अनेक मोठे खुलासे