---Advertisement---

शिक्षक दिन | योग्य मार्गदर्शनामुळे ‘या’ दिग्गजांनी केले देशाचे नाव, खास पोस्ट करून दिल्या शुभेच्छा

On: सोमवार, सप्टेंबर 5, 2022 7:00 PM
---Advertisement---

सोमवारी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांसाठी म्हणजेच थोडक्यात त्यांच्या गुरुंसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. क्रीडा क्षेत्रात देखील खेळाडूंना मोठे नाव करण्यासाठी एका चांगल्या प्रशिक्षकाची आवश्यकात असते, जो त्यांना पुढे घेऊन जाईल. क्रीडा क्षेत्रात अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी  चांगले प्रशिक्षक मिळाल्यामुळे त्यांनी पुढे जाऊन देशासाठी नाव कमावले. असे अनेक प्रशिक्षक देखील आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनात अनेक मोठे खाळाडू तयार झाले. आजच्या दिवशी या खेळाडूंकडून त्या प्रशिक्षकांचे आभार मानले जात आहे. चला तर अशाच काही खेळाडूंच्या पोस्ट पाहू ज्यांना शिक्षक दिनानिमित्र सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

पुलेला गोपीचंद, महावीर फोगाट, बलदेव सिंह, रमाकांत आचरेकर आणि जसपाल राणा अशा अनेकांसाठी शिक्षक दिन खास आहे. या दिग्गजांच्या मार्गदर्शनात अनेक खेळाडू घडले आहेत आणि त्यापैकी काहींनी देशासाठी पदके आणि चषके देखील जिंकली आहेत.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने खास पोस्ट केली आहे. विराट सध्या भारतीय संघासोबत यूएई दौऱ्यावर आहे, ज्याठिकाणी आशिया चषक 2022 खेळला जात आहे. मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्मशी झगडणारा विराट आशिया चषकात पुन्हा फॉर्ममध्ये परतल्यासारखा दिसत आहे. त्याने आतापर्यंत दोन अर्धशतक केली आहेत. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देताना विराटने लिहिले की, “सर्व शिक्षक आणि मेंटॉर्सचे समाजाप्रती योगदान अमूल्य आहे.” विराटव्यतिरिक्त इतरही काही दिग्गजांनी शिक्षक दिनानिमित्त चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने देखील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पुजारने लिहिले की, “आपण संपूर्ण आयुष्य शिकतच असतो. प्रत्येक वेळी हे धडे घेण्यासाठी काही लोक मदत करत असतात. सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.”

भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) यानेही त्याच्या शिक्षकांचे आभार मानले. युवराजने ट्वीटमध्ये लिहिले की, “माझ्या शिक्षकांनी प्रामाणिकपणे मला जे धडे आणि नैतिकता शिकवली. मला कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि कधीच हार न मानण्याचे मूल्ये शिकवल्याबद्दल त्यांचा आभारी आहे.”

भारताचे प्रतिनिधित्व करणारी स्टार बॉक्सर एमसी मॅरिकॉम हिनेही शिक्षक दिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. मेरीकॉमने केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “शिक्षकांचा प्रभाव वर्गाच्या बाहेर भविष्यावर देखील पडतो. सर्व मेहनती शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी खेळाडूला नाबाद दिल्यामुळे भारतीय चाहत्यांनी घातला गोंधळ, पंचांशी रोहितची चर्चा व्यर्थ
INDvsPAK | एकट्या अर्शदीपवर फुटलं पराभवाचं खापर, पण रोहितसह ‘हे’ चौघेही राहिलेत व्हिलन
पाकिस्तान विरुद्ध सामना गमावल्यानंतरही विराटच आहे टी20चा किंग, कॅप्टन रोहितला टाकले मागे  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---