---Advertisement---

FIFA WC2022: मेस्सी, रोनाल्डोवर भारी पडला कॅनडाचा फुलबॉलपटू! नोंदवला ऐतिहासिक गोल, व्हिडिओ पाहाच

Alphonso Davies Scored Fastest Goal Of FIFA WC 2022
---Advertisement---

कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषकात लियोनल मेस्सी, क्रिस्तियानो रोनाल्डो, रॉबर्ट लेवांडोस्की यांनी गोल करत सामन्यांची चुरस वाढवली. मात्र, रविवारी (27 नोव्हेंबर) ग्रुप एफमधील क्रोएशिया विरुद्ध कॅनडा यांच्यात खेळल्या गेलेल्या साखळी सामन्यातील एका गोलने सर्वांचे लक्ष वेधले. हा गोल केला कॅनडाच्या अल्फोन्सो डेव्हिस याने. त्याने केवळ एक गोल करत विश्वचषकात इतिहास तर रचलाच त्याचबरोबर सुरू असलेल्या विश्वचषकातील एक विक्रमही आपल्या नावावर केला.

खलिफा इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात क्रोएशियाने विजय मिळवला. तरीही त्यांच्यावर बायर्न म्युनिकचा स्टार खेळाडू अल्फोन्सो डेव्हिस (Alphonso Davies)याचा एक गोल भारी पडला. त्याने फिफा विश्वचषक 2022चा सर्वात जलद गोल करण्याता विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने मैदानावर उतरताच 69 सेंकद एवढ्या वेळातच हा गोल केला. तरीही त्यांच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला, कारण क्रोएशियाने केवळ दोनच नाहीतर चार गोल केले.

फिफा विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात जलद गोल करण्याचा विक्रम तुर्कीच्या हकन सुकुर याच्या नावावर. त्याने 2002च्या स्पर्धेत दक्षिण कोरिया विरुद्ध केवळ 11 सेंकदात गोल केला होता.

https://twitter.com/JioCinema/status/1596906095511212032?s=20&t=YeZyZuCJELpHp85H-gtKGg

या सामन्यात क्रोएशियाने जबरदस्त पुनरागमन केले. आंद्रेज क्रॅमारिच याने दोन गोल करत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. कॅनडाचा संघ तब्बल 36 वर्षानंतर विश्वचषकात परतला होता आणि त्यांनी साखळी फेरीतील दोन्ही सामने गमावत स्पर्धेबाहेर पडले.

डेव्हिसने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. आपल्या सुरूवातीच्या सामन्यात मोरोक्को विरुद्ध एकही गोल न करणाऱ्या क्रोएशियाने या सामन्यात चार गोल केले. 2018चा उपविजेत्या क्रोएशियाच्या क्रॅमारिचने 36व्या आणि 70व्या, मार्को लिवाजा याने 44व्या मिनिटाला आणि लोवेरो मायर याने 94व्या मिनिटाला गोल केले. कर्णधार लुका मॉड्रीच गोल स्पर्धेत पहिला गोल करण्यात पुन्हा अपयशी ठरला.

https://twitter.com/FIFAWorldCup/status/1596926699014340620?s=20&t=YO2b_Uk0Eku-KXTlutnarg

कॅनडाने पहिले दोन्ही सामने गमावले असून त्यांचा शेवटचा सामना बेल्जियमविरुद्ध आहे, ज्यामध्ये विजय मिळाला तरी काहीच फायदा नाही. कॅनडा 1986च्या विश्वचषकात खेळला होता आणि तेव्हाही ते साखळी फेरीतूनच बाहेर झाले होते. Alphonso Davies created history vs Croatia fastest goal of FIFA World cup 2022

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावसामुळे सामना गेला वाया! तरीही अफगाणिस्तानला मिळाले 2023 वर्ल्डकपचे तिकीट, श्रीलंकेच्या वाढल्या अडचणी
FIFA WORLD CUP: चार वेळेचा ‘चॅम्पियन’ जर्मनीची डोकेदुखी वाढली! स्पेनविरुद्धचा सामना सुटला बरोबरीत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---