ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि इंग्लंड (Australia vs England) महिला संघांमध्ये ऍशेस मालिकेतील एकमात्र कसोटी सामना पार पडला. हा सामना रोमांचक स्थितीत आल्यानंतर अनिर्णीत राहिला. दोन्ही संघातील खेळाडूंनी या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यादरम्यान मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि एलिसा हेलीची (Alyssa Healy) जोडी चर्चेत आली आहे. हे दोघेही खास क्षण एकत्र घालवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (२९ जानेवारी) पावसाचे आगमन झाले होते. ज्यामुळे हा सामना थांबवण्यात आला होता. संघातील सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये विश्रांती करताना दिसून आले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघाची यष्टिरक्षक फलंदाज एलिसा हेली आपला पती मिचेल स्टार्क सोबत ड्रेसिंग रूममध्ये रोमँटिक क्षण घालवताना दिसून आली होती.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एलिसा हेलीने मिचेल स्टार्क सोबत रोमँटिक गप्पा मारत असताना, डोनट खाण्याची ऑफर दिली. त्याने या डोनटचा स्वीकार करत अर्धा स्वतः कडे ठेवला आणि अर्धा एलिसा हेलीला दिला. हा व्हिडिओ ७ क्रिकेटने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वी मिचेल स्टार्कची २०२१ मधील ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेपटू आणि सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली होती. तर एलिसा हेलीची २०२१ मधील ऑस्ट्रेलियाची सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेपटू म्हणून निवड करण्यात आली होती.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलिया संघाने या सामन्यातील पहिला डाव ९ बाद ३३७ धावांवर घोषित केला होता. ज्यामध्ये रशेल हेन्सने ८६ तर लेनिंगने ९३ धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाला पहिल्या डावात २९७ धावा करण्यात यश आले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघाला २१६ धावा करण्यात यश आले होते. इंग्लंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी २५७ धावांची आवश्यकता होती. परंतु इंग्लंड संघाला या सामन्यात अवघ्या ९ बाद २४५ धावा करता आल्या.
महत्वाच्या बातम्या :
युवराज सिंगचा विचित्र चेहऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, भज्जीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
युवराज सिंगने सांगितली ४ खेळाडूंची नावे, जे टीम इंडियातील निवडीसाठी सर्वाधिक पात्र
हे नक्की पाहा:






