न्यूझीलंडमध्ये रविवारी (०३ एप्रिल) ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळला गेलेला महिला वनडे विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने ७१ धावांनी जिकला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला असाध्य असे ३५७ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ४३.४ षटकांमध्ये २८५ धावांवरच सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाला विक्रमी सातव्यांदा विश्वचषक जिंकून देण्यात त्यांची यष्टीरक्षक फलंदाज एलिसा हिली हिचा मोठा हात राहिला. तिने या सामन्यात शतक करत मोठे विक्रमही आपल्या शिरपेचात नोंदवले आहेत.
विश्वचषक अंतिम सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक खेळी
इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात (Women ODI World Cup Final) सलामीला फलंदाजी करताना हिलीने (Alyssa Healy) १७० धावा फटकावल्या. १३८ चेंडू खेळताना २६ चौकारांच्या मदतीने तिने ही शानदार खेळी केली. ही महिला वनडे विश्वचषक अंतिम सामन्यातील सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली आहे. हिलीपूर्वी ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू कॅरेन रॉल्टन हिच्या नावे हा पराक्रम होता. तिने २००५ मध्ये भारताविरुद्ध अंतिम सामन्यात नाबाद १०७ धावा फटकावल्या होत्या. मात्र आता हिलीने तिचा विक्रम मोडित काढला आहे. याव्यतिरिक्त ती आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १५० पेक्षा जास्त धावा करणाराही पहिलीच फलंदाज ठरली आहे.
महिला विश्वचषक अंतिम सामन्यातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या:
१७० – एलिसा हिली विरुद्ध इंग्लंड, २०२२
१०७* – कॅरेन रोल्टन विरुद्ध भारत, २००५
९१ – बेलिंडा क्लार्क विरुद्ध न्यूझीलंड, २०००
८६ – पुनम राऊत विरुद्ध इंग्लंड, २०१७
७९ – डेबी हॉकले विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९९७
असा पराक्रम करणारीही पहिलीच फलंदाज
हिलीने (Alyssa Healy Records) अंतिम सामन्यापूर्वी उपांत्य फेरी सामन्यातही वेस्ट इंडिजविरुद्ध शतक केले होते. या सामन्यात तिने १२९ धावांची खेळी करत संघाला अंतिम सामन्यात पोहोचवले होते. यासह ती विश्वचषकात उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात सलग शतके करणाराही पुरुष आणि महिला क्रिकेटमधील पहिलीच खेळाडू ठरली आहे.
तर विश्वचषकात कोणत्याही २ सामन्यांमध्ये सलग शतक करणारी ती दुसरीच खेळाडू ठरली आहे. तिच्यापूर्वी १९९७ मध्ये न्यूझीलंडच्या डेबी हॉकले हिने श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध सलग शतकी खेळी केल्या होत्या.
यष्टीरक्षक म्हणूनही हे विक्रम केले नावे
याखेरीज कोणत्या वनडे मालिकेत दोनपेक्षा जास्त शतके करणारीही हिली केवळ दुसरीच यष्टीरक्षक फलंदाज आहे. तिच्यापूर्वी रिचेल प्रिएस्टने २०१५ मध्ये हा विक्रम आपल्या नावे केला होता. तिने या मालिकेत २ पेक्षा जास्त शतके केली होती.
याखेरीज संपूर्ण विश्वचषकात ४४५ धावा करत करत हिली एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणाराही पहिली खेळाडू बनली आहे. तिच्यापूर्वी सारा टेलरने २०१७ सालच्या विश्वचषकात ३९६ धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: आपली बॅटिंग भारी, आपली फिल्डिंग भारी! बटलरने हवेत झेपावत घेतलेला झेल ठरतोय चर्चेचा विषय