ऑस्ट्रेलियाचा महिला संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आज (२७ सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात दुसरा टी२० सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १९.२ षटकात सर्वबाद १२८ धावा केल्या. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून यष्टीरक्षण करणाऱ्या एलिसा हेलीने १ झेल घेतला आणि १ यष्टीचीत केला आहे. त्यामुळे तिच्या नावावर एक खास विक्रम केला आहे.
एलिसा हेलीचा विश्वविक्रम, एमएस धोनीलाही टाकले मागे
सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून ओळखला जाणाऱ्या धोनीला एलिसा हेलीने टाकले मागे, केला हा विश्वविक्रम
एमएस धोनीला मागे टाकत एलिसा हेलीने पटकावला अव्वल क्रमांक, पाहा कोणता केलाय विश्वविक्रम
तिच्या आता आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये यष्टीमागे ९२ विकेट्स झाल्या आहेत. त्यामुळे तिने आंतरराष्ट्रीय २० मध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यष्टीरक्षकांच्या (महिला आणि पुरुष मिळून) यादीत एमएस धोनीला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे. भारताचा माजी दिग्गज यष्टीरक्षक एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ९१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या या ९१ विकेट्समध्ये ५७ झेल आणि ३४ यष्टीचीत विकेट्सचा समावेश आहे. तसेच हेलीने आत्तापर्यंत यष्टीमागील ९२ विकेट्सपैकी ४२ झेलांचा आणि ५० यष्टीचीत विकेट्सचा समावेश आहे.
या यादीत हेली आणि धोनी पाठोपाठ इंग्लंडची सारा टेलर असून तिने यष्टीमागे ७४ विकेट्स घेतले आहेत.
आज झालेल्या सामन्यात हेलीने उत्तम यष्टीरक्षणाबरोबरच १२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून १७ चेंडूत ३३ धावांची खेळीही केली.