क्रिकेटच्या मैदानावर दोन संघातील खेळाडूंमध्ये वाद होणे सामान्य गोष्ट आहे. पण एकाच संघातील दोन खेळाडूंमध्ये वाद होणे दुर्मिळ आहे. असाच काहीसा प्रकार वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात घडला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ त्याच्याच संघाच्या कर्णधाराशी भिडला. हा सर्व प्रकार लाइव्ह सामन्यादरम्यान घडला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाहुण्या संघाने गोलंदाजीत दमदार सुरुवात करत इंग्लंडला 9 धावांवर पहिला धक्का दिला. 3 षटकांत इंग्लंडची धावसंख्या 1 गडी गमावून 10 धावा होती. यानंतर चौथ्या षटकात अल्झारी जोसेफ गोलंदाजीसाठी आला. या षटकासाठी वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपने स्लिपमध्ये दोन क्षेत्ररक्षक ठेवले. मात्र, पहिल्या चेंडूनंतर जोसेफने आपल्या कर्णधाराला एक स्लिप काढून क्षेत्ररक्षकाला पॉइंटवर ठेवण्यास सांगितले. मात्र कर्णधाराने आपल्या गोलंदाजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
दुसरा चेंडू टाकल्यानंतर अल्झारीने आपल्या कर्णधाराला क्षेत्ररक्षणाबद्दल काहीतरी सांगितले आणि आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतरही कर्णधाराने क्षेत्ररक्षणात कोणताही बदल केला नाही. यानंतर गोलंदाज चांगलाच संतापला आणि तिसऱ्या चेंडूवर शानदार बाऊन्सर मारत जॉर्डन कॉक्सला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विकेट घेतल्यानंतर कर्णधार आणि अल्झारी यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यानंतर षटक पूर्ण केल्यानंतर गोलंदाज रागाने मैदानाबाहेर गेला आणि डगआऊटमध्ये बसला. एका षटकानंतर अल्झारी जोसेफ पुन्हा मैदानात परतला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Gets angry! 😡
Bowls a wicket maiden 👊
Leaves 🤯An eventful start to the game for Alzarri Joseph! 😬#WIvENGonFanCode pic.twitter.com/2OXbk0VxWt
— FanCode (@FanCode) November 6, 2024
या सामन्यात फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकात 8 गडी गमावून 263 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून मॅथ्यू फोर्डने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर अल्झारी जोसेफने 10 षटकांत 45 धावांत 2 फलंदाज बाद केले. रोमॅरियो शेफर्डनेही 2 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 264 धावांचे लक्ष्य 2 गडी गमावून पूर्ण केले. कॅरेबियन संघाने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली.
हेही वाचा-
IND VS AUS; भारताला मिळाला नवा कसोटी सलामीवीर? रोहितच्या जागी करु शकतो ओपनिंग
श्रेयस अय्यरची बॅट पुन्हा तळपली, ओडिशाविरुद्ध शानदार द्विशतक, निवड समीतीचे डोळे उघडणार?
IND VS SA; दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाचा दबदबा, असा आहे हेड टू हेड रेकाॅर्ड