इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनने खुलासा केला आहे की, इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामात आपला भाऊ टॉमला गोलंदाजी करण्यासाठी धावताना हसणे थांबवू शकत नव्हता. सॅम चेन्नई सुपर किंग्सचे (सीएसके) प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये एमएस धोनी चेन्नईचा कर्णधार आहे. तर टॉम या हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी काही सामने खेळले आहेत. सॅम करनने ज्या घटनेचा उल्लेख केला आहे ती घटना मागील हंगामातील आहे जेव्हा टॉम राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता.
सॅमने एका पॉडकास्टमध्ये ‘हेडस्ट्राँगः न इनिंग्स विथ’ मध्ये खुलासा करताना म्हटले, “आम्ही बर्यापैकी स्पर्धात्मक वातावरणात मोठे झालो आहोत. ज्यात फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण सर्व करावे लागले. यावर्षी मी आयपीएलमध्ये टॉमविरुध्द खेळलो आहे. इतक्या मोठ्या मंचावर खूप मजा येते. मी प्रथम त्याच्याविरुद्ध गोलंदाजीसाठी धावत होतो तेव्हा मला हसू आवरत नव्हते.”
तो पुढे म्हणाला, “तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि गंभीर व्हायला हवे. मात्र, कधीकधी तुम्हाला मजा देखील घ्यायची असते. हे तेच घडत होते.”
सॅमने हे देखील कबूल केले की जेव्हा त्याच्या भावाने बॅटच्या बाहेरील किनार्यावर चेंडू लागून चौकार गेला तेव्हा तो तितकासा खूष नव्हता. यानंतर आपण टॉमशी चर्चा केल्याचे देखील त्याने सांगितले.
मागील वर्षाच्या या सामन्यात सॅमने ३३ धावा देऊन तीन बळी घेतले आणि सहा चेंडूंत १७ धावा केल्या. तर, टॉम नऊ चेंडूत १० धावा करून नाबाद राहिला. त्या सामन्यात मोठा भाऊ टॉमच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई झाली होती. त्याने चार षटकात ५४ धावा देऊन केदार जाधवचा बळी मिळवला होता. टॉम करनने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल दिल्ली कॅपिटल्स संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. तर, सॅम करनने पंजाब किंग्स व चेन्नई सुपर किंग्स या संघांसाठी मिळून तीन हंगाम खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पोहचले एकदाचे! आयपीएल स्थगितीनंतर दोन आठवड्यांची प्रतिक्षा संपवून ऑस्ट्रेलियन सदस्यांची अखेर घरवापसी
अन् मनदीप सिंग उतरला दक्षिण आफ्रिकेकडून क्षेत्ररक्षणासाठी तेही टीम इंडियाविरुद्ध, ‘हे’ होते कारण






