सोमवारी (दि. 20 फेब्रुवारी) महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील 18वा सामना भारतीय महिला विरुद्ध आयर्लंड महिला संघात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार 5 धावांनी विजय साकारला. तसेच, उपांत्य सामन्यात धडक दिली. असे असले, तरीही या रोमांचक सामन्यात डोळ्याचं पारणं फेडणारे क्षण पाहायला मिळाले. भारतीय संघाच्या डावात आयर्लंडच्या महिला खेळाडूंनी असे काही क्षेत्ररक्षण केले, जे पाहून क्रिकेट चाहत्यांनीही तोंडात बोटे घातली. आयर्लंडची महिला खेळाडू ओरला प्रेंडरगास्ट हिने तिच्या शानदार झेलाने सर्वांची मने जिंकली.
ओरला प्रेंडरगास्टने झेलला शानदार चेंडू
भारतीय संघाच्या डावातील 16व्या षटकात हा क्षण पाहायला मिळाला. कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) 19 चेंडूत 13 धावांवर खेळत होती. 16वे षटक लॉरा डेलानी टाकत होती. तिने पाचवा चेंडू हरमनप्रीतला टाकताच चेंडू मिडविकेटच्या दिशेने उडाला. चेंडू जवळ येतोय हे पाहून तिथे उभी असलेली क्षेत्ररक्षक ओरला प्रेंडरगास्ट ( Orla Prendergast) हिने धाव घेतली आणि डाईव्ह मारत शानदार झेल घेतला. ओरलाच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे हरमनप्रीतला 13 धावांवरच तंबूत परतावे लागले.
https://www.instagram.com/reel/Co4yzCArg_q/?utm_source=ig_embed&ig_rid=1090a8df-6ded-4abb-a902-08a9879bbb7c
गॅबी लुईसचे शानदार क्षेत्ररक्षण
यानंतर पुन्हा एकदा आयर्लंडची खेळाडू गॅबी लुईस हिने शानदार क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवला. तिने लॉराच्या पुढील सहाव्या चेंडूवर ऋचा घोष हिला झेलबाद केले. तिने चेंडू सरळ दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, पण तिथे उभी असलेली खेळाडू गॅबी लुईस (Gaby Lewis) हिने एका हाताने शानदार झेल घेतला. हा झेल पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गॅबीच्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे ऋचाला शून्य धावेवर तंबूत परतावे लागले.
स्मृती मंधानाच्या 87 धावा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 155 धावा चोपल्या होत्या. यावेळी स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने दमदार खेळी साकारत 56 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांची बरसात करत 87 धावा चोपल्या. ही तिच्या टी20 कारकीर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. (amazing catch orla prendergast gaby lewis in womens t20 world cup ind women vs ire women match video viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी त्याला प्रशिक्षण देत नाही…’, राहुलच्या फ्लॉप कामगिरीवर कोच द्रविडची सर्वात मोठी प्रतिक्रिया
दिलदार विराट! एका नाही, तर वृद्धाश्रमातील 52 आजी-आजोबांना भेटून रडलेला कोहली; वाचून तुम्हीही व्हाल भावूक