टी20 विश्वचषक (T20 World Cup)2022चा पहिला उपांत्य सामना पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यात बुधवारी (9 नोव्हेंबर)खेळला गेला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र कर्णधार केन विलियमसन याचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. पहिल्या दहा षटकातच न्यूझीलंडचे तीन खेळाडू 59 धावसंख्येवर तंबूत परतले. सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डेवॉन कॉनवे ज्याप्रकारे धावबाद झाला, त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने 20 षटकात 4 विकेट्स गमावत 152 धावसंख्या उभारली. त्याआधी न्यूझीलंडने त्यांचे सलामीवीर स्वस्तात गमावले. फिन ऍलन आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) हे काही अंतराने बाद झाले. यावेळी ऍलनची विकेट जशी वादग्रस्त ठरली, तसेच कॉनवेला धाबबाद करणाऱ्या शादाब खान याचा थ्रो कौतुकास्पद ठरला. त्याने ज्या चपळाईने चेंडू फेकला त्याचा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
झाले असे की, हॅरीस रौफ सहावे षटक टाकण्यास आला. त्याने या षटकातील तीन चेंडू 140पेक्षा अधिक वेगाने फेकले. याच षटकातील शेवटच्या चेंडूने कॉनवेचा घात केला. कॉनवेने त्या चेंडूवर शॉट अप्रतिम खेळला, मात्र चेंडू वर उचलला गेल्याने शादाबला तो सहज पकडता आला. त्याने ज्याप्रकारे थ्रो केला, तो जबरदस्तच होता. आयसीसीनेही त्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेयर केला, तर कॉनवे गेल्याने न्यूझीलंडला मोठा धक्का बसला. कारण त्यानेच या स्पर्धेतील पहिल्या विजयी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 92 धावा केल्या होत्या. amazing throw by Shadab Khan
https://www.instagram.com/reel/Cku9_8kM9V1/?utm_source=ig_web_copy_link
कॉनवे बाद झाल्यावर न्यूझीलंडचा संघ थोडा अडखळला. त्याचक्षणी कर्णधारपदाची जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडत केन विल्यमसन याने 42 चेंडूत 46 धावा केल्या. त्याने डॅरिल मिचेल याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 50 चेंडूत 68 धावांची भागीदारी केली. विल्यमसन बाद झाल्यावर मिचेलने डाव सांभाळलाा. तो 35 चेंडूत 53 धावा करत नाबाद राहिला.
या सामन्यात शाहीन आफ्रिदीने 4 षटकात 22 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. शादाबने 4 षटके टाकली, मात्र त्याला विकेट घेण्यात यश आले नाही आणि त्याने 33 धावा दिल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानने न्यूझीलंडला रोखलं! अंतिम फेरी गाठण्यासाठी बाबर सेनेसमोर 153 धावांचे लक्ष
कर्णधार रोहितची मोठी हिंट! सांगूनच टाकलं, पंत अन् कार्तिकपैकी इंग्लंडविरुद्ध कोणाला उतरवणार