Ambati Rayudu Politics Retirement: भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू याने मुंबई इंडियन्स संघात परतणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, त्याची घरवापसी इंडियन प्रीमियर लीगमध्ये होणार नाही, तर यूएईमध्ये होणाऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय लीगमध्ये होणार आहे.
आएल टी20 2024 19 जानेवारीपासून युएईमध्ये सुरू होईल आणि अंबाती रायुडू (Ambati Rayudu) स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या मालकीच्या एमआय अमिरात संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
उल्लेखनीय म्हणजे, चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2023 जिंकल्यानंतर रायुडूने आयपीएलमधून निवृत्ती घेतली होती. त्याने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सकडून त्याच्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात केली आणि आयपीएल 2017 पर्यंत तो मुंबईकडून खेळला होता. त्यानंतर तो चेन्नई संघाचा भाग होता.
आएल टी20 साठी स्वतःला उपलब्ध करून देण्यासाठी रायुडूने सांगितले आहे की ,त्याने YSR काँग्रेस पार्टी सोडली आहे, ज्यात तो काही दिवसांपूर्वी सामील झाला होता. मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी, उपमुख्यमंत्री के नारायण स्वामी आणि राजमपेट लोकसभा सदस्य पी मिथुन रेड्डी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला होता.
सोशल मीडियावर एक पोस्ट करत रायुडू म्हणाला की, “सर्वांना सांगायचे आहे की, मी YSRCP पक्ष सोडण्याचा आणि काही काळ राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. योग्य वेळी पुढील माहिता दिली जाईल.”
This is to inform everyone that I have decided to quit the YSRCP Party and stay out of politics for a little while. Further action will be conveyed in due course of time.
Thank You.
— ATR (@RayuduAmbati) January 6, 2024
हे सर्व घडल्यानंतर दोन दिवसातच रायुडूने राजकारण सोडण्याचे कारण सांगितले, पोस्ट करत तो म्हणाला, “मी अंबाती रायुडू येत्या 20 जानेवारीपासून दुबई येथे होणाऱ्या आएल टी20 मध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करेन. ज्यासाठी मला व्यावसायिक खेळ खेळताना राजकीयदृष्ट्या गैरसंबंधित असणे आवश्यक आहे.”
I Ambati Rayudu will be representing the Mumbai Indians in the upcoming ILt20 from jan 20th in Dubai. Which requires me to be politically non affiliated whilst playing professional sport.
— ATR (@RayuduAmbati) January 7, 2024
त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने भारतासाठी 55 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि 47.06 च्या सरासरीने एकूण 1694 धावा केल्या आहेत. 124 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. यादरम्यान त्याने तीन शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने भारतासाठी 6 टी20 सामने खेळताना 42 धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये रायुडूने 204 सामने खेळले, त्यात एक शतक आणि 22 अर्धशतकांसह 4348 धावा केल्या आणि 100 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने मुंबई इंडियन्सकडून आयपीएल 2013, 2015 आणि 2017 ट्राफी जिंकली आणि नंतर चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल 2018, 2021 आणि 2023 ची ट्राफी जिंकली. (Ambati Rayudu again in Mumbai Indians team will play these important matches)
हेही वाचा
पोलार्डच्या नाराजीचे कारण समजले, मुंबई फ्रँचायझीमुळेच ठेवली ‘ती’ इंस्टाग्राम स्टोरी
T20 World Cup स्पर्धेत पाहायला मिळणार ‘विराट शो’, रोहितसह संघात कमबॅक! आकडेवारी एकदा पाहाच