रायुडू लवकरच करणार नव्या इनिंगची सुरुवात? घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट

भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज अंबाती रायुडू सध्या चर्चेत आहे. कारण ठरले रायडू आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यातील भेट. रायुडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेश संघासाठी बराच काळ खेळला आहे. नुकतीच पार पडलेली आयपीएलमध्येही रायुडूचा संघ चेन्नई सुपर किंग्ज विजेता ठरला. रेड्डींशी भेट घेण्यासाठी आलेला रायुडू आपल्यासोबत आयपीएल ट्रॉफीही घेऊन आला होता.
अंबाती रायुडू (Ambati Rayudu) आणि वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्यात भेट झाल्यापासून वेगवेगळ्या चर्चां रंगू लागल्या आहेत. अनेकांच्या मते रायुडू लवकरच रेंड्डींच्या वायएसआरसी पक्षात प्रवेश करणार आहे. सोशल मीडियावर नेटकरी याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या भेटीची माहिती आंध्र प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून दिली गेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शेअर केलेल्या व्हिडिओत रायुडूसोबत या भेटीवेळी रुपा गुरुनाथ देखील होत्या.
సీఎం క్యాంప్ కార్యాలయంలో ముఖ్యమంత్రి శ్రీ వైఎస్ జగన్ను కలిసిన చెన్నై సూపర్ కింగ్స్ మేనేజ్మెంట్, క్రికెటర్ అంబటి రాయుడు.
సీఎస్కే టీంను అభినందించిన ముఖ్యమంత్రి శ్రీ వైఎస్ జగన్. pic.twitter.com/bwTm32LkjB— CMO Andhra Pradesh (@AndhraPradeshCM) June 8, 2023
रुपा चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन यांची मुलगी आहे. या दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेताना आयपीएल ट्रॉफी सोबत आणली आहेच. पण त्याचसोबत सीएसके खेळाडूंच्या स्वक्षरी असणारी जर्सी देखील त्यांना भेट म्हणून दिली. दुसरीकडे रायुडू आणि सीएसकेने पाचव्यांना आयपीएल ट्रॉफी जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, अंबाती रायुडूने नुकताच आपला शेवटचा क्रिकेट सामना खेळला. आयपीएल 2023 चा अंतिम सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा ठरला. या सामन्यात रायुडूनेचा सीएसके संघा गुजरात टायटन्सविरुद्ध जिंकला. विजयात रायुडूचे योगदान महत्वाचे राहिले. त्याने अवघ्या 8 चेंडूत 19 धावा कुटल्या आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. शेवटच्या दोन चेंडूंवर रविंद्र जडेजाने एक षटकार आणि एक चौकार मारून विजय मिळवला. या विजयासोबतच सीएसके पाचव्यांना आयपीएल चॅम्पियन बनली आणि संघाने मुंबई इंडियन्सची बरोबरी केली. रायुडूच्या आयपीएल कारकिर्दीत तो सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावू शकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितने रिव्ह्यूची उडवली खिल्ली, पंचांना गोंधळात टाकण्यासाठी केले ‘हे’ कृत्य; लगेच पाहा
ट्रेविस हेडने सोडली मोठी संधी! एक धाव कमी पडल्याने 111 वर्षांचा विक्रम अबाधित