भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू आता पुन्हा कधीच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना सोमवारी (29 मे) चेन्नई सुपर किंग्जने जिंकला. सीएसकेचे प्रतिनिधित्व करत असलेल्या अंबाती रायुडू () याच्यासाठी हा कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. सामन्यापूर्वीच रायुडूने याविषयी सर्वांना माहिती दिली होती. गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतर रायुडूची भावूक करणारी प्रतिक्रिया समोर येत आहे.
उभय संघांतील हा आयपीएल 2023चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर पार पडला. सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. अशात सीएसकेच्या डावात पंचांना डकवर्थ लुईस नियमाचा वापर करावा लागला. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) या सामन्यानंतर आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करेल, असे अनेकांना वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. दुसरीकडे अंबाती रायुडू (Ambati Rayudu) मात्र अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट केल्याप्रमाणे आयपीएलमधून निवृत्त झाला आहे. रायुडूची आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल कारकीर्द मोठी राहिली आहे. सोमवारी सामना संपल्यानंतर त्याने चाहते आणि निकटवर्तीयांचे आभार मानले.
सामना संपल्यानंतर रायुडू (Ambati Rayudu) म्हणाला, “हा एका अध्यायाचा शेवट आहे. मी अजून मागू शकत नाही. मला एका महान संघाकडून खेळण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. आता मी आयुष्यभर हसू शकतो. मागच्या 30 वर्षांमध्ये मी जेवढी मेहनत घेतली, त्याचा शेवट अशा पद्धतीने झाला, याचा आनंद आहे. मी खरोखर माझे कुटुंब आणि खासकरून वडिलांना धन्यवाद म्हणू इच्छितो. त्यांच्याशिवाय हे साध्य होऊ शकले नसते.”
A fairytale ending ????
Congratulations to #TATAIPL 2023 Champion Ambati Rayudu on a remarkable IPL career ????????????????#TATAIPL | #Final | #CSKvGT | @RayuduAmbati pic.twitter.com/4U7N3dQdpw
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर सीएसकेला विजयासाठी गुजरातकडून 215 झावांचे लक्ष्य मिळणार होते. पण स्टेडियममध्ये पाऊस आल्यामुळे पंचांकडून सीएसकेला विजयासाठी 15 षटकांमध्ये 171 धावांचे लक्ष्य मिळाले. रविंद्र जडेजा याने शेवटच्या दोन चेंडूंवर लागोपाठ षटकार आणि चौकार मारल्यामुळे सीएसकेने सामना जिंकला. अंबाती रायुडू देखील 8 चेंडूत 19 धावांचे योगदान देऊ शकला. रायुडूने सीएसकेच्या डावातील 13व्या षटकात पहिल्या तीन चेंडूंवर दोन षटकार आणि चौकार मारला, पण चौथ्या चेंडूवर झेलबाद देखील झाला. (Now I can smile for the rest of my life, because my IPL career has ended on a good note, said Ambati Rayudu)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाव मोठं, लक्षण खोटं! कोट्यवधी रुपये घेऊनही ‘हे’ 5 स्टार खेळाडू फ्लॉपच, इंग्लंडच्या 3 पठ्ठ्यांचा समावेश
WTC Final साठी गेलेल्या भारतीय खेळाडूंनी लंडनमधून अनुभवला IPL फायनलचा थरार, फोटो पाहिले का?