---Advertisement---

लग्नाच्या ११ वर्षानंतर भारतीय क्रिकेटरला मिळाली गुड न्यूज, झाला एका मुलीचा बाप

On: मंगळवार, जुलै 14, 2020 6:55 AM
---Advertisement---

नवी दिल्ली | भारतीय क्रिकेट संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडू बाप झाला आहे. रायडू ची पत्नी विद्याने सोमवारी एका मुलीला जन्म दिला आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती देण्यात आली आहे. अंबातीच्या घरी एक छोटी पाहुणी आली आहे. त्याची पत्नी विद्याने एका मुलीला जन्म दिला आहे.

याच संघातील अंबातीचा संघसहकारी सुरेश रैनानेही रायडूला शुभेच्छा दिल्या आहेत. “तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरी एक गोड मुलगी जन्माला आली आहे,” असे रैनाने आपल्या संदेशात म्हटले आहे.

जगभरात सध्या करोना व्हायरसविरुद्ध लढा सुरू आहे. अशातच रायडूला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. रायडू मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. करोनामुळे सर्व क्रिकट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. मार्च २०१९ पासून रायडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---