इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची अवस्था अशी होईल, असं कुणालाही वाटलं नसेल. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे ज्यानं अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. आयपीएलच्या लिलावापूर्वी, मुंबईनं त्यांचा माजी खेळाडू हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्समधून संघात आणलं. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याला कर्णधार बनवण्यात आलं. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले, मात्र तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.
अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला. त्यानंतर हैदराबादमध्ये सनरायझर्सविरुद्ध दुसरा सामनाही त्यांनी गमावला. घरच्या मैदानावर झालेल्या तिसऱ्या सामन्यात मुंबईला राजस्थान रॉयल्सविरुद्धचा दारूण पराभवाचा सामना करावा लागला.
अहमदाबाद आणि हैदराबादनंतर चाहत्यांनी मुंबईतही हार्दिक पांड्याविरोधात जोरदार बूइंग केली. या सामन्यात हार्दिक पांड्यानं एक अवघड झेल सोडला, ज्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. चाहत्यांकडून हार्दिकला ज्या द्वेषाचा सामना करावा लागतोय, ते पाहणं खूपच निराशाजनक आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यानंतर हार्दिक निराश होऊन डगआउटमध्ये बसला होता. तेव्हा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू त्याला भेटायला आला.
रायुडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन फ्रँचायझींकडून खेळला आहे. तो काही वेळ हार्दिकशी बोलला आणि नंतर त्याला मिठी मारली. व्हिडिओमध्ये अंबाती हार्दिकचं सांत्वन करताना दिसतोय. अंबाती रायडू आणि हार्दिक पांड्या यांच्या भेटीचा हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सनं त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘आपण खाली का पडतो? जेणेकरून पुन्हा कसं उभं राहायचं हे शिकावं यासाठी”. तसं पाहिलं तर मुंबई आयपीएलमध्ये कमबॅक करण्यासाठी ओळखली जाते. त्यांनी याआधीही असं बऱ्याचदा करून दाखवलंय. मात्र आता ते आयपीएल 2024 मध्ये असं पुन्हा करू शकतात का?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
???????????? ???????? ???????? ????????????????? ???????? ???????????????? ???????? ???????????? ???????????????????? ???????? ???????????????? ???????????????????????????????????? ????????. ????#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @hardikpandya7 pic.twitter.com/k3YSlofEdV
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये रचला इतिहास, आजपर्यंत कोणताही संघ हा पराक्रम करू शकला नाही
ज्याची भीती होती तेच झालं! वानखेडेमध्ये हार्दिक पांड्याविरुद्ध जोरदार बूइंग, ‘रोहित-रोहित’च्या घोषणा
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज, रोहित शर्माच्या नावे लज्जास्पद विक्रम






