राजस्थान राॅयल्सनं एलिमिनेटरमधील सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला 4 विकेट्सनी मात दिली. त्यामुळं पुन्हा एकदा आरसीबीचं ट्राॅफीच स्वप्न भंगलं. अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर हा सामने खेळला गेला. या पराभवानंतर आरसीबी स्पर्धेतून बाहेर पडली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू अंबाती रायडूनं खडेबोल सुनावत आरसीबी संघाची खिल्ली उडवली आहे. आरसीबीच्या पराभवानंतर रायडूच्या विधानाची चर्चा होत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएलमधील पराभवानंतर रायडूने विराट कोहलीच्या संघाची खिल्ली उडवली. सामना संपल्यानंतर स्टार स्पोर्ट्सवरील संभाषणात रायडू म्हणाला, “चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध बंगळुरूच्या खेळाडूंनी आक्रमक सेलिब्रेशन केलं होतं. त्यामुळेच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.” असे वादग्रस्त विधान व्यक्त केले.
रायडूनं कोणत्या एका खेळाडूवर टीका न करता संपूर्ण संघावर कूच करत म्हणाला, “फक्त आक्रमक सेलिब्रेशन करून ट्राॅफी जिंकता येत नाही.” आरसीबीनं शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला धूळ चारत प्लेऑफ मध्ये क्वालिफाय केलं होतं. या सामन्यानंतर विराट कोहलीसह संपूर्ण संघातील खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केलं होतं. त्यावेळी कोहली खूपच आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन करताना दिसला.
यादरम्यान रायडू म्हणाला, “आयपीएल ट्रॉफी सेलिब्रेशन करून, आक्रमकता दाखवून, सीएसकेला हरवून जिंकता येत नाही. ट्रॉफी जिंकण्यासाठी प्लेऑफ मध्ये तुम्हाला चांगले प्रदर्शन करावे लागेल.”
रायडूने सल्ला देत पुढे म्हटले की, आरसीबीला भारतीय खेळाडू आणि भारतीय प्रशिक्षकांवर विश्वास ठेवावा लागेल. ही इंडियन प्रीमियर लीग आहे. आणि त्यामध्ये तुम्ही भारतीय खेळाडूंकडे दुर्लक्ष करूच शकत नाही. जर तुम्ही सीएसके, केकेआर व एमआयकडे पाहिले, तर त्यांनी भारतीय खेळाडूंवर विश्वास ठेवला. त्यांना चांगले समजून घेतले. त्यामुळेच आयपीएलमध्ये यशस्वी ठरले आहेत.”
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान कधी करणार टी20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा?
संजू सॅमसन अनुभवी शेन वॉर्नला टाकणार मागे, लिहिणार कर्णधारपदाचा नवा अध्याय..
प्ले-ऑफमधील पराभवानंतर RCBच्या दिग्गजाची निवृत्तीची घोषणा, क्रिकेट वर्तुळातून….