भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर निशाणा साधला आहे. वास्तविक, यंदाच्या हंगमात विराट कोहलीने 15 सामन्यात 61.75 च्या सरासरीने सर्वाधिक 741 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट कोहलीने ऑरेंज कॅप जिंकली. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने विराट कोहलीच्या जागी ऑरेंज कॅप घेतली. यानंतर विराट कोहलीचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ प्ले करण्यात आला. विराट कोहलीने या व्हिडिओद्वारे आपले मत व्यक्त केले.
विराट कोहलीला ऑरेंज कॅप मिळाल्यानंतर अंबाती रायडूने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि विराट कोहलीवर पुन्हा निशाणा साधला. तुम्ही ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी खेळत नाही, पण तुम्हाला आयपीएल ट्रॉफी जिंकायची आहे. जर एखाद्या संघाने आयपीएलचे विजेतेपद जिंकले तर जवळपास सर्वच खेळाडू त्यात योगदान देतात. असं म्हणत अंबाती रायडूने आरसीबी आणि विराट कोहलीवर टीका केली आहे.
अंबाती रायडूने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि विराट कोहलीवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो आरसीबी आणि विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्जला हरवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. त्यावेळी अंबाती रायडूने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, केवळ चेन्नई सुपर किंग्जला हरवून आणि तुमच्या आक्रमक खेळाने तुम्ही आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकत नाही. अंबाती रायडूची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. तसेच, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कमेंट करून भरपूर प्रतिक्रिया दिल्या होत्या. अंबाती रायडू आयपीएलच्या मागील हंगामात आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल मधून निवृत्ती घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
अर्रर्र… रियान परागनं हे काय केलं? युट्युबची सर्च हिस्ट्री झाली व्हायरल पाहा व्हिडीओ