---Advertisement---

BREAKING: अंबाती रायुडूची 9 दिवसांच्या राजकारणातून निवृत्ती, YSRCP सोडून दिला सर्वांना आश्चर्याचा धक्का

On: शनिवार, जानेवारी 6, 2024 12:34 PM
Ambati-Rayudu-retirement-from-politics
---Advertisement---

Ambati Rayudu retirement from politics: अंबाती रायडू याने धक्कादायक निर्णय घेऊन राजकारण सोडले आहे. राजकारण सोडण्याच्या निर्णयाबाबत त्यानी स्वतः सांगितले आहे. रायुडूने युवाजन श्रमिका रिथू काँग्रेस पार्टी (YSRCP) चा राजीनामा दिला आहे. रायुडू केवळ 9 दिवसांपूर्वी म्हणजेच 28 डिसेंबर रोजी पक्षात सामील झाला होता. त्याने राजकारण कायमचे सोडले नसले तरी काही काळासाठी तो राजकारणापासून दूर राहिला आहे.भारताच्या या माजी क्रिकेटपटूने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निर्णयाबद्दल सांगितले आहे. (ambati rayudu resign from ysrcp party and quit politics for some time know details)

https://twitter.com/RayuduAmbati/status/1743496401525551398?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1743496401525551398%7Ctwgr%5E848cc774181b71335e8227ded55845d7f7504c51%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Fambati-rayudu-resign-from-ysrcp-party-and-quit-politics-for-some-time-know-details-2578622

अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याने ट्विट करून सांगितले की, “सर्वांना कळवत आहे की, मी YSRCP पक्ष सोडण्याचा आणि काही काळ राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील घोषणा योग्य वेळी केली जाईल.”

28 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत राडुयू यानी पक्षात प्रवेश केला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी, मिथुन रेड्डी हेही उपस्थित होते. राडुयु यानी पक्ष सोडण्याच्या निर्णयाबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. योग्य वेळ आल्यावर पुढील कारवाईची माहिती देणार असल्याचे त्यानी सांगितले.

रायुडूने आयपीएल 2023 नंतर क्रिकेटला अलविदा केला होता. 2023 च्या आयपीएलमध्ये रायडू चेन्नई सुपर किंग्जचा एक भाग होता, जो चॅम्पियन बनला होता. मात्र, याआधी 2019 मध्ये रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.

माजी भारतीय क्रिकेटपटूच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 55 एकदिवसीय आणि 6 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. याशिवाय त्याने आपल्या करिअरमध्ये 203 आयपीएल सामने खेळले आहेत. (BREAKING Ambati Rayudu retires from politics in 9 days quits YSRCP shocks everyone)

हेही वाचा

एमएस धोनी आणि एमसी स्टॅन दिसले एकत्र; चाहत्यांना लवकरच देणार मोठे सरप्राईज
Ranji Trophy 2023-24: रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान राडा, मुंबईविरुद्ध खेळण्यासाठी बिहारचे 2 संघ पोहोचले मैदानात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---