चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील रंगतदार सामन्याने इंडियन प्रीमियर लीगचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र, या सामन्यात चेन्नईला मोठा धक्का बसला. त्यांचा अनुभवी फलंदाज अंबाती रायडू दुखापतग्रस्त झाला आहे. मुंबईने या सामन्यात चांगली सुरुवात केली होती. त्यांनी फाफ डू प्लेसिस आणि मोईन अली यांना शून्यावर बाद केले होते. त्यानंतर रायडू देखील जायबंदी झाला.
अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला आणि त्याने ऋतुराज गायकवाडसह डाव पुन्हा उभा करणे अपेक्षित होते. पण ऍडम मिल्ने आपल्या पहिल्या षटकात वेगवान गोलंदाजी करत होता आणि रायडूला पहिल्या दोन चेंडूंवर धाव घेता आली नाही.
सामन्याच्या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अंबाती रायुडूने धावा काढण्यासाठी ऑफ साईडला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला. पण मिल्नेने एक उसळता चेंडू टाकला ज्याचा अंदाज रायडूला आला नाही. चेंडू थेट रायुडूच्या हाताला लागला आणि त्यामुळे तो वेदनेने व्हिवळताना दिसला. फिजिओने लवकरच मैदानावर हजेरी लावली आणि थोड्या विचारविनिमयानंतर, रायपडूने सतत वेदना होत असल्याने त्याने तेथून निघण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तो रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला.
https://twitter.com/CowCorner9/status/1439601688789204999
दरम्यान, प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर चेन्नईने त्यांच्या डावाची वाईट सुरुवात केली. डु प्लेसिस आणि मोईन अलीला गमावल्यानंतर अंबाती रायडू जखमी होऊन निघून गेला. ट्रेंट बोल्टच्या पुढच्याच षटकात त्यांनी सुरेश रैनालाही बाद झाला. पण यानंतर रविंद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी भागीदारी केली आणि चेन्नईचा डाव सावरला.
ऋतुराजने ८८ धावांची दमदार खेळी खेळली. तर जडेजाने २६ धावा केल्या. तसेच ड्वेन ब्रावोने ८ चेंडूत २३ धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे चेन्नईने २० षटकांत ६ बाद १५६ धावा करत मुंबईसमोर १५७ धावांचे आव्हान उभे केले. मुंबईकडून ऍडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
तसेच १५७ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई संघाने नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. दरम्यान, एक बाजू सौरभ तिवारीने सांभाळली होती. त्याने नाबाद ५० धावा केल्या. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने भक्कम साथ मिळाली नाही. त्यामुळे मुंबईचा डाव २० षटकांत ८ बाद १३६ धावांवर संपला आणि चेन्नईने २० धावांनी विजय मिळवला. चेन्नईकडून ड्वेन ब्रावोने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, तर दीपक चाहरने २ विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
“गिल आणि राणा भारताची पुढची पिढी, ते कदाचित येत्या दशकात आपली छाप सोडू शकतात”
धावबाद झालेल्या फलंदाजाने दुसऱ्या फलंदाजाच्या अंगावर फेकली बॅट, पाहा गमतीदार व्हिडिओ
गेल म्हणतोय, “मी उद्या पाकिस्तानला जात आहे, माझ्याबरोबर कोण येणार?”