भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तीन वर्षांपूर्वीच निवृत्त झाला आहे. तो सध्या केवळ इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना दिसतो. धोनीने निवृत्तीनंतरही दोन वेळा चेन्नईला विजेतेपद मिळवून दिले आहे. सहा वर्ष चेन्नईचा भाग राहिलेला अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू याने नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने धोनीबाबत एक मोठा खुलासा केला.
रायुडू याने एका पॉडकास्टमध्ये बोलताना अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. यावेळी त्याला धोनी आणि तुझ्यात क्रिकेटबद्दल किती चर्चा होते? असा प्रश्न विचारला गेलेला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला,
MS Dhoni and his love for food, farming and bikes.pic.twitter.com/Q8NuxQOdoT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 25, 2023
“आमच्यामध्ये क्रिकेटबद्दल काहीही चर्चा होत नाही. धोनी आणि मी इतर गोष्टींवर जास्त बोलत असतो. त्याला नैसर्गिकरित्या उगवलेली फळे, शेती तसेच बाईक्स याबद्दल हे बोलणे असते. जगातील कोणत्याही प्रश्नावर आमची चर्चा होते.”
धोनी निवृत्तीनंतर रांची येथील आपल्या फार्म हाऊसवर राहून सेंद्रिय शेती करत आहे. तो अनेक वेळा शेतीमध्ये काम करताना तसेच ट्रॅक्टर चालवताना दिसतो. तसेच त्याचे गाड्यांवरील विशेष प्रेम सर्वांना माहीत आहे. याव्यतिरिक्त तो आपल्या कुटुंबाला देखील वेळ देताना दिसतो.
रायुडू याने 2010 ते 2017 या कालावधीत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर 2018 मध्ये तो चेन्नई संघाकडे आला. तो संघाचा भाग असताना चेन्नईने 2018, 2021 व 2023 असे तीन वेळा विजेतेपद पटकावले. आयपीएल 2023 नंतर त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता.
(Ambati Rayudu Speaks On MS Dhoni Interests Ahead Cricket)
महत्वाच्या बातम्या –
WPL 2024: लिलावाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस
रोहितचा Future Plan आला समोर, विराटबद्दलही मिळाली माहिती; वाचा दक्षिण आफ्रिका दौऱ्याशी संबंधित अपडेट