भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने आंतरराष्ट्रीय तसेच आयपीएल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आयपीएल इतिहासातील महान खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो. आयपीएलमधील दोन सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स या संघाचा सदस्य राहिला होता. दोन्ही संघांसोबत मिळून तब्बल सहा वेळा आयपीएल विजेता राहिलेल्या रायुडू याने या संघांच्या चाहत्यांविषयी नुकताच एक खुलासा केला.
रायुडू याने नुकतेच एका पॉडकास्टसाठी मुलाखत दिली. यामध्ये त्याला मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्या चाहत्यांमधील फरक विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना तो म्हणाला,
“मुंबई इंडियन्सचे चाहते मला अधिक लॉयल वाटतात. कारण ते खेळाडूपेक्षा संघाचे समर्थक आहेत. कोण खेळाडू आले गेले याने त्यांना फरक पडत नाहीत. ते अखेरपर्यंत संघाला पाठिंबा देत असतात. दुसरीकडे चेन्नईचे फॅन्स हे अधिक तर माही भाईचे फॅन आहेत. माही भाईनंतर कदाचित ते सामना पाहण्यासाठी त्या संख्येने येणार नाहीत.”
धोनी सध्या चाळीस वर्षांचा असला तरी आयपीएलमध्ये खेळत आहे. पुढील हंगाम हा कदाचित त्याचा अखेरचा हंगाम होऊ शकतो. मागील दोन वर्षात लोक केवळ धोनी याचा खेळ पाहण्यासाठी मैदानात आल्याचे दिसून येते.
रायुडू याचा विचार केल्यास त्याने 2010 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केले होते. तो 2017 पर्यंत संघाचा भाग राहिला. यादरम्यान मुंबईने तीन वेळा विजेतेपद आपल्या नावे केले. 2018 मध्ये चेन्नईने त्याला आपल्याकडे खेचले. 2018, 2021 व 2023 असे तीन वेळा चेन्नईला विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा राहिला. मागील हंगामात त्याने आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
(Ambati Rayudu Speaks On Mumbai Indians And Chennai Super Kings Fans)
हेही वाचा-
टी20 वर्ल्डकपसाठी क्वालिफाय होत युगांडाने रचला इतिहास! झिम्बाब्वेची हुकली वर्ल्डकप वारी
IPL 2024: एबी डिव्हिलियर्सची धोनीच्या आयपीएल करियरबाबत मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘तो आणखी तीन…’