fbpx
Sunday, April 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निवृत्त झालो म्हणून हलक्यात घेऊ नका; या खेळाडूच्या खेळीने दिला संदेश

Ambati rayudu stars in ms dhoni chennai super kings first win in ipl

September 20, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

युएईमध्ये खेळल्या गेलेला आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाने जिंकला आहे. या सामन्यात एमएस धोनीच्या सीएसकेने गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा 5 गडी राखून पराभव केला आहे. सीएसके संघातर्फे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणजे अंबाती रायडू.तो दहा महिन्यांनंतर क्रिकेट सामना खेळत होता.

अंबाती रायडू सामन्यात फलंदाजीसाठी उतरला तेव्हा चेन्नई सुपर किंग्ज संघाने 6 धावांत 2 गडी गमावले होते. संघावर दबाव होता. 163 धावांचे लक्ष्य होते. अनुभवी फलंदाज रायडूला ठाऊक होते की जर फलंदाजी काळजीपूर्वक केली तर लक्ष गाठणे कठीण काम नाही. पण केवळ टी-20 मध्ये खेळपट्टीवर टिकून सामना जिंकता येत नाही. वारंवार आक्रमण करण्याचीसुद्धा गरज असते. अंबाती रायडू याने ही जबाबदारी स्वीकारली.

रायडू तोच खेळाडू आहे ज्याला जानेवारी 2019 पर्यंत भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हटले जात होते. पण मार्च 2019 मध्ये कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्यावर अविश्वास दाखवला व वनडे विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघात स्थान दिले नाही.

काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात रायडूने दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज फाफ डु प्लेसीसबरोबर 115 धावांची भागीदारी केली. या 115 धावांपैकी 71 धावा एकट्या रायडूच्या आहेत. डु प्लेसीस एका टोकाला सावकाश खेळत होता आणि दुसर्‍या टोकाला रायडू मुंबई संघाच्या गोलंदाजांचे आक्रमण नष्ट करत होता. त्याने सामन्यात सर्वाधिक धावाच केल्या नाही तर चौकार आणि षटकार मारण्यातही तो आघाडीवर होता. रायडूने 48 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार लगावले.

निवृत्त झाल्यामुळे हलक्यात घेऊ नका

34 वर्षीय अंबाती रायडू बाद झाला तेव्हा चेन्नई संघाचा विजय निश्चित झाला होता. या डावातून रायडूने संदेश दिला की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये हलक्या पद्धतीने घेण्याची चूक करू नये.

निराश होऊन घेतली होती निवृत्ती

2019 मधील वनडे विश्वचषकात त्याला संधी मिळाली नाही. तसेय या वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरची निवड झाली होती. त्यामुळे निराश होऊन रायडूने निवृत्ती घेतली होती. पण त्यानंतर त्याने निवृत्तीतून माघार घेतली.


Previous Post

सामना जिंकूनही धोनी दिसला नाही समाधानी; हे आहे कारण

Next Post

श्रेयस अय्यर आणि केएल राहुल ‘या’ ११ खेळाडूंसह आज उतरतील मैदानावर, पहा कुणाला मिळेल जागा

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@SunRisers
IPL

MIvSRH: फॉर्मात असलेल्या नटराजनला संघाबाहेर ठेवण्यामागचे कारण काय? संघ डायरेक्टरनी दिले उत्तर

April 18, 2021
Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

क्षेत्ररक्षण करताना ट्रेंट बोल्टचा तोल गेला अन् घडलं असं काही; चाहते म्हणाले, ‘ही फील्डिंग की स्विमिंग’

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी 

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

सुपर संडे: आज कोहली-मॉर्गन आमने सामने, ‘अशी’ असेल आरसीबी आणि केकेआरची प्लेइंग XI

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

MIvSRH: रोहितच्या ब्रिगेडचा सलग दुसरा विजय, कर्णधाराने ‘यांना’ ठरवले मॅच विनर

April 18, 2021
Next Post

श्रेयस अय्यर आणि केएल राहुल 'या' ११ खेळाडूंसह आज उतरतील मैदानावर, पहा कुणाला मिळेल जागा

कहर धोनीचा! पहिल्याच आयपीएल सामन्यात नावावर केले एक-दोन नव्हे तर ३ किर्तीमान

चेन्नईच्या 'या' ५ खेळाडूंनी चारली मुंबईला धूळ, ३६ वर्षीय खेळाडूने केले नेत्रदिपक प्रदर्शन

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.