---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ खेळाडू करणार पुढच्या सामन्यात पुनरागमन

On: शनिवार, सप्टेंबर 26, 2020 2:42 PM
---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने सलग दोन सामने गमावले आहेत.  मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर संघ राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही सामन्यात संघ लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार धोनीनेही कबूल केले की, संघात एका फलंदाजाची कमतरता जाणवत आहे. मात्र, आता पुढच्या सामन्यात धोनीला दिलासा मिळू शकेल.  स्टार फलंदाज अंबाती रायुडूची दुखापत बरी झाली असून पुढील सामन्यात पुनरागमन करू शकतो.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या पराभवानंतर धोनी म्हणाला की, वरच्या फळीतील फलंदाजांनी वेगाने सुरुवात न केल्याने पुढे दबाव वाढत गेला. पुढच्या सामन्यात अंबाती रायुडूच्या आगमनाने संघाचे संतुलन सुधारेल असे धोनीने म्हटले आहे. आयपीएलच्या 13 व्या हंगामापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या अडचणींना सुरुवात झाली होती. संघाचा स्टार फलंदाज सुरेश रैनाने यंदाच्या लीगमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगनेही वैयक्तिक कारणास्तव या हंगामात लीगमधून माघार घेतली.

तसेच आत्तापर्यंत झालेल्या चेन्नईच्या तिन्ही सामन्यात मुरली विजय आणि शेन वॉटसन यांनी अद्याप संघाला दमदार सुरुवात करुन दिली नाही. युवा फलंदाज ऋतूराज गायकवाडलाही दोन सामन्यात मिळालेल्या संधीचा फायदा उठवता आला नाही.

रायुडूने मुंबई इंडियन्सविरुध्द 71 धावा करून संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.  पण त्यानंतर दुखापतीमुळे त्याला दोन सामने खेळता आले नाहीत. पण तो येत्या 2 ऑक्टोबरला संघ पुढील सामना खेळणार आहे. त्यामुळे चेन्नई संघाचे संतुलन अधिक चांगले होईल.

फलंदाजांशिवाय चेन्नईच्या संघातील फिरकीपटूही लयीत नाहीत.  राजस्थान रॉयल्सविरुद्ध गोलंदाज योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत नव्हते आणि ते दिल्लीविरुद्ध प्रभावी खेळ करू शकले नाहीत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---