---Advertisement---

‘तुम्हाला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही’, अमेरिकन जिम्नॅस्टच्या समर्थनार्थ उतरले रवी शास्त्री

---Advertisement---

अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बाइल्सने टोकियो ऑलिम्पिकमधील महिला संघाच्या अंतिम आणि ऑलराउंड स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे ती ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचा बचाव करण्यासाठी उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या मागचे महत्वाचे कारण असे की, अमेरिकेच्या या जिम्नॅस्टने तिच्या मानसिक आरोग्यावर लक्ष देण्यासाठी स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयावर जगभरातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

बाइल्सला वाटले की, ती मानसिकदृष्ट्या तयार नाही. बर्‍याच जिम्नॅस्ट्स आणि इतर खेळाशी संबंधित लोकांनी बाइल्सच्या निर्णयाचे उघडपणे समर्थन केले आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील तिच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे ट्विट केले की, ‘सिमोन बाइल्स तुम्ही तुमचा पूर्ण वेळ घ्या. इतक्या कमी वयात तुम्ही हा हक्क मिळवला आहे. यास ४८ तास किंवा ४८ दिवस लागतील. तुम्हाला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. नाओमी ओसाका, तुम्हाला देखील. ’

बाइल्स आपल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील वैयक्तिक स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा की नाही, हे ठरवणार आहे.

तसेच यापूर्वी जपानची टेनिसपटू नाओमी ओसाकाने मानसिक आरोग्याचे कारण देत फ्रेंच ओपन २०२१ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. फ्रेंच ओपनमधून माघार घेतलेल्या २३ वर्षीय ओसाकाने सांगितले की, २०१८ मध्ये तिने पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकल्यापासून ती नैराश्यात गेली आहे.

आयओसीने खेळाडूंसाठी मानसिक आरोग्य हेल्पलाईन सुरू केली

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त असलेल्या खेळाडूंसाठी ७० भाषांमध्ये हेल्पलाइन सुरू केली आहे. याच संदर्भात आयओसीचे प्रवक्ते मार्क एडम्स म्हणाले की, याला “मानसिक स्वास्थ्य हेल्पलाइन” असे नाव देण्यात आले आहे आणि ही सुविधा २४ तास सुरू राहणार आहे.

ऑलिम्पिक खेळ संपल्यानंतरही ३ महिन्यांपर्यंत ही सेवा पुरवली जाणार आहे. आयओसीच्या मतानुसार, हेल्पलाइन त्वरित सहाय्य, अल्प मुदतीचे समुपदेशन, व्यावहारिक सहाय्य आणि आवश्यक असल्यास दुर्व्यवहाराच्या घटनांमध्ये मदत करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठ्या मनाचा माणूस! देशासाठी ‘अशी’ मोठी मदत करत जिंकली मनं

‘हा फलंदाज असेल शिखर धवनचा उत्तराधिकारी’, वीरूचे मोठे भाकीत

‘गोल्डन डक’ वर बाद होताच ‘कर्णधार’ शिखर धवनच्या नावे जमा झाला ‘हा’ नकोसा विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---