मुंबई । कोरोना व्हायरसच्या सावटात इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. ही भयानक परिस्थिती पाहता भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने आणखी एक क्रिकेट मालिका रद्द करण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयने यापूर्वी मार्च महिन्यांपासूनच्या सर्व मालिका रद्द केल्या होत्या.
भारतात येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात इंग्लंडविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका होणार होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बीसीसीआय ही मालिका देखील रद्द करण्याच्या विचारात आहे.
बीसीसीआयचे अधिकारी याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की, “इंग्लंडचा भारत दौरा रद्द होऊ शकतो. या परिस्थितीत ही मालिका आयोजित करणे अशक्य आहे. ही मालिका पुढे आयोजित केली जाऊ शकते. याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी आमचे बोलणे झाले नाही.”
बीसीसीआयने यापूर्वी जुलै ऑगस्टमध्ये झिम्बाब्वे आणि श्रीलंकेसोबतची होणारी मालिका रद्द केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाला असला तरी भारतीय संघ सध्या क्रिकेट खेळत नाही.
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावरून परत आल्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना खेळला नाही. मार्च महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर वनडे मालिका खेळण्यासाठी आला होता. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही मालिका मध्येच रद्द करण्यात आली.