---Advertisement---

अमित मिश्राचा कॅप्टन्सीवरुन शुबमन गिलवर हल्लाबोल; म्हणाला, “त्याला नेतृत्व कसं करावं हेसुद्धा माहित नाही…”

amit mishra, shubman gill
---Advertisement---

Amit Mishra on Shubman Gill Captaincy: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू अमित मिश्रा (Amit Mishra) याने नुकत्याच एका मुलाखतीत भारतीय खेळाडूंबाबत मोठी विधाने केली आहेत. प्रसिद्धी आणि सत्तेमुळे विराट कोहली (Virat Kohli) खूप बदलला असून भारतीय संघात त्याचे फार कमी मित्र असल्याचे त्याने सांगितले. तसेच विराट आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद, मुंबई इंडियन्सचा नेतृत्त्वबदलाचा वाद, इत्यादी विषयांवर त्याने भाष्य केले आहे. यादरम्यान नुकतेच झिम्बाब्वेविरुद्ध भारताला 4-1 ने टी20 मालिका जिंकून देणारा कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याच्याबाबतही अमित मिश्राने मोठे वक्तव्य केले आहे.

भारतीय संघाने युवा कर्णधार गिलच्या नेतृत्त्वाखाली झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला सामना 13 धावांनी गमावला होता. मात्र त्यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत मालिका 4-1 अशी जिंकली. या कामगिरीबद्दल गिलच्या कर्णधारपदाचे कौतुक होत आहे, पण एकेकाळी भारतीय संघाचा भाग असलेल्या अमित मिश्राने गिलच्या कर्णधारपदाबाबत तिखट वक्तव्य केले आहे.

‘यूट्यूबवर शुभंकर मिश्रा’च्या मुलाखतीत अमित मिश्राला विचारण्यात आले की, गिलला कर्णधारपद देण्याबाबत तुमचे काय मत आहे? यावर मिश्रा म्हणाला, “मला वाटत नाही की त्याला कर्णधार बनवायला हवे. मी तिथे असतो तर मी त्याला नेतृत्त्वपद दिले नसते. मी त्याला आयपीएलमध्ये पाहिले आहे, त्याला नेतृत्त्व कसे करावे हे माहित नाही. त्याला नेतृत्त्वाचा अजिबात अनुभव नाही. उठा आणि एखाद्याला भारतीय संघाचा कर्णधार बनवा, असं करुन चालणार नाही”

पुढे बोलताना मिश्रा म्हणाला की, “गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या शेवटच्या क्षणी मुंबई इंडियन्सकडे गेला; तेव्हा गुजरात टायटन्सकडे पर्याय नव्हता. त्यामुळे कदाचित पर्याय उपलब्ध नसल्याने गिलला कर्णधारपदी निवडण्यात आले असावे. परंतु भारतीय संघाच्या कर्णधारपदाबाबत सांगायचे झाल्यास, मला वाटते की निवड समितीला भविष्यात नेतृत्त्वपदासाठी पर्याय खुले ठेवायचे आहेत म्हणून हा प्रयोग करुन पाहिला गेला असेल.”

महत्वाच्या बातम्या-

आंद्रे रसलची एक चेंडू आणि ट्रेव्हिस हेडच्या बॅटचे दोन तुकडे, बॅट्समनचे रियाक्शन पाहण्यासारखे!
“रोहित शर्मा खूश नव्हता…”, आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या वादावरून दिग्गज गोलंदाजाचा मोठा दावा
हार्दिक पांड्याची श्रीलंका दौऱ्यातून माघार, या फॉरमॅटमध्ये खेळणार नाही! आता कोण होणार कर्णधार?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---