इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार केएल राहुल यांच्यातील वादाने खळबळ उडाली होती. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा सामना हरल्यानंतर गोयंका आणि राहुल यांच्यातील जोरदार वाद कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सनरायझर्सने 166 धावांचे लक्ष्य अवघ्या 9.4 षटकात पूर्ण केले आणि सामना 10 विकेटने जिंकला. सामना संपल्यानंतर गोयंका यांनी राहुलशी ज्याप्रकारे संवाद साधले त्यांच्यातील हे संभाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले होते.
लखनऊ सुपर जायंट्सचा फिरकीपटू अमित मिश्राने एका यूट्यूब चॅनेशी बोलताना संघातील अनेक गोष्टी सांगितल्या. लखनऊ सुपर जायंट्सने सलग दोन सामने वाईट रीतीने गमावल्यामुळे गोयंका खूप संतापले असल्याचे त्यांनी सांगितले. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध संघ 90-100 धावांनी पराभूत झाला आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा सामना तर अवघ्या 10 षटकांत संपला.
अमित मिश्रा म्हणाला ” संघाचे मालक खूप निराश झाले होते .आम्ही सलग दोन सामने अतिशय वाईट पद्धतीने हरलो होते. नाईट रायडर्सविरुद्ध आम्ही 90-100 धावांनी सामना गमावला होता आणि सनरायझर्सविरुद्धचा सामना 10 षटकांत संपला होता. असे वाटत होते की आम्ही नेट प्रॅक्टिसमध्ये गोलंदाजी करत आहोत. करण आमची कामगिरी खूपच निराशजनक होती. आमच्या कामगिरीवर आम्हालाच रोग येत होता. तर ज्या व्यक्तीने संघात पैसे गुंतवले आहेत तो रागावणार का नाही?
तो पुढे म्हणाला- “ही काही मोठी गोष्ट नव्हती. पण नंतर मला कळले की त्याने सांगितले होते की गोलंदाजी खूपच खराब होती आणि संघाने थोडी लढाई दाखवायला हवी होती. असे वाटत होते की आम्ही पूर्णपणे विरोधी संघासमोर शरणागती पत्करली. पण मला वाटते की लोक आणि मीडिया या प्रकरणाला फारच (प्रमाणाबाहेर) मोठे केले.
आयपीएल 2025 पूर्वी राहुलला लखनउ सुपर जायंट्सकडून कायम ठेवले जाणार नाही, असे अनेक वृत्त अहवालांमध्ये म्हटले आहे, परंतु संघ किंवा खेळाडूकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. जर असे झाल्या आयपीएल 2025 मध्ये मेगा ऑक्शन होणार आहे. अश्या परिस्थित केएल राहुल लिलावात उतरल्यास त्याला मोठी रक्कम मिळू शकते.
महत्तवाच्या बातम्या-
सुट्टी संपली, कामावर या! टीम इंडियाचा नवा हेडमास्तर गंभीरचा विराट, रोहित अन् बुमराहला मॅसेज
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीचा डंका! पदकाचे प्रबळ दावेदार हे 6 कुस्तीपटू
विराट-गौतमच्या वादावर अमित मिश्रानं केलं मोठं वक्तव्य! म्हणाला, “विराट सतत शिवीगाळ…”