---Advertisement---

…आणि अमित मिश्राची आयपीएलमधील चौथी हॅट्रीक हुकली, पहा व्हिडिओ

On: शनिवार, मे 4, 2019 7:12 PM
---Advertisement---

दिल्ली। आज(4 मे) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल 2019मधील 52 वा सामना फिरोजशहा कोटला स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात दिल्लीचा फिरकी गोलंदाज अमित मिश्राला त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील चौथी हॅट्रीक घेण्याची संधी होती. पण ट्रेंट बोल्टने झेल सोडल्याने ही संधी हुकली.

या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण सुरुवातीला दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने तीन विकेट्स घेत राजस्थानला मोठे धक्के दिले. त्यानंतर अमित मिश्राने गोलंदाजीला राजस्थानची अवस्था आणखी बिकट केली.

राजस्थान फलंदाजी करत असताना 12 व्या षटकात मिश्राला हॅट्रिकची संधी होती. या षटकात त्याने दुसऱ्या चेंडूवर श्रेयस गोपाळची विकेट घेतली. गोपाळला दिल्लीचा यष्टीरक्षक रिषभ पंतने यष्टीचीत केले. त्याच्यानंतर लगेचच तिसऱ्या चेंडूवर मिश्राने स्टुअर्ट बिन्नीला शुन्य धावेवर बाद केले. बिन्नीचा झेल यष्टीमागे पंतने घेतला.

विशेष म्हणजे या षटकातील चौथ्या चेंडूवरही मिश्राला विकेट घेण्याची संधी होती. त्याने टाकलेल्या या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या कृष्णप्पा गॉथमने फटका मारला, पण तो चेंडू उंच हवेत उडाला.

त्यामुळे झेल घेण्यासाठी बोल्ट आणि शेर्फन रुदरफोर्डने कॉल दिला. पण अखेर बोल्टने उडी मारत झेल पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा आंदाज चूकला, त्यामुळे झेलही सुटला आणि मिश्राची हॅट्रिकही हुकली.

आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक तीन वेळा हॅट्रिक घेण्याचा पराक्रम मिश्राच्या नावावर आहे. मिश्राने आत्तापर्यंत 2008, 2011 आणि 2013 या तीन मोसमात हॅट्रिक घेतली आहे.

आजच्या सामन्यात राजस्थानकडून रियान परागने सर्वाधिक 50 धावा केल्या. त्याने ही खेळी करताना 49 चेंडूचा सामना केला. तसेच 4 चौकार आणि 2 षटकार मारले.  त्याने राजस्थानच्या नियमित कालांतराने विकेट जात असताना एका बाजूने डाव सांभाळून ठेवत ही अर्धशतकी खेळी केली.

राजस्थानकडून पराग व्यतिरिक्त फक्त श्रेयस गोपाळ(12) आणि लियाम लिव्हिंगस्टोन(14) यांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. अन्य फलंदाज एकेरी धावसंख्येवरच बाद झाले. त्यामुळे राजस्थानला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 115 धावाच करता आल्या.

दिल्लीकडून इशांत शर्मा आणि अमित मिश्राने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्टने 2 विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

१७ व्या वर्षी आयपीएलमध्ये शानदार अर्धशतक करणाऱ्या रियान परागने रचला इतिहास

टी20 मुंबई लीगमध्ये अर्जून तेंडूलकरला लागली एवढ्या लाखांची बोली

१९ वर्षीय शुबमन गिलने शानदार अर्धशतकासह आयपीएलमध्ये केला मोठा पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment