मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुप्रतिक्षित झुंड सिनेमाला अखेर मुहूर्त मिळाला. सर्वकालीन महान अभिनेते अमिताभ बच्चन प्रमुख भूमिका करत असलेला हा चित्रपट ४ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल. नागराज मंजुळे यांनी फेसबुक पोस्ट करत या विषयी माहिती दिली.
https://www.facebook.com/1704772843/posts/10209739750926237/?d=n
नागपूर येथील फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी बारसे यांनी स्लम साखर ही अकादमी सुरू केली होती. त्याचाच प्रवास या चित्रपटातून दाखवण्यात येईल. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना लोक डाऊन मुळे चित्रपटाला अखेर दोन वर्षानंतर प्रदर्शनाचा मुहूर्त सापडला आहे.
कोण आहेत विजय बारसे
विजय बारसे हे नागपूर येथील एका महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. २००१ मध्ये त्यांनी आर्थिक व दुर्बल घटकांतील तसेच झोपडपट्टीतील मुलांसाठी स्लम सॉकरही अकादमी सुरू केली. त्यानंतर पत्नी रंजना व मुलगा अभिजित यांच्या मदतीने त्यांनी क्रीडा विकास संस्थेची नागपूर येथे मुहूर्तमेढ रोवली. आमीर खान याच्या प्रसिद्ध सत्यमेव जयते या शोमध्ये सर्वप्रथम बारशे यांची कहाणी दाखवण्यात आली होती.
नागराज मंजुळे यांचे हिंदीत पदार्पण
या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असलेले मराठीतील नामांकित दिग्दर्शक नागराज मंजुळे हे या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. मंजुळे यांनी यापूर्वी सैराट व फॅन्ड्री या सारखे राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.