भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन बलाढ्य क्रिकेट संघ विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यात आमने सामने आहेत. वनडे विश्वचषकाचा हा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. या सामन्यात अनेक बॉलिवूड स्टार्स मैदानात हजेरी लावणार आहेत. मात्र, बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन या सामन्यासाठी उपस्थित राहावे की नाही, हा विचार करत आहेत.
जगातील काही मोजक्या सुप्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे नाव घेतले जाते. भारतीय संघाने विश्वचषकाच्या चालू हंगामात एकही पराभव न स्वीकारता अंतिम सामन्यात स्थान पक्के केले. तसेच ऑस्ट्रेलियन संघाने उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला 3 विकेट्सने मात दिली आणि अंतिम सामन्यात जागा बनवली. भारतीय संघाने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला (15 नोव्हेंबर) 70 धावांनी पराभूत केले. या विजयानंतर अमिताभ बच्चन यांनी भारतीय संघाचे अभिनंदन करण्यासाठी एक मजेशीर पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये लिहिले आहे की, “जेव्हा मी सामना जिंकत नाही, तेव्हा आपण जिंकतो.”
T 4831 – when i don’t watch we WIN !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 15, 2023
या पोस्टनंतर अमिताभ अंतिम सामन्याविषयी संभ्रमात असल्याचे दिसते. गुरुवारी (15 नोव्हेंबर) अमिताभच्या ‘एक्स’वरून अजून एक पोस्ट केली गेली. यात लिहिले होते की, “आता विचार करत आहे जाऊ की, नको जाऊ!” अमिताभच्या या दोन्ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेकांनी त्यांना अंंतिम सामन्यासाठी मैदानात न जाण्याचा सल्लाही दिला आहे.
T 4832 – अब सोच रहा हूँ, जाऊँ की ना जाऊँ !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 16, 2023
काहींच्या मते अमिताभने सामना पाहिल्यानंतर भारत पराभूत होणार असेल, तर त्यांनी घरच्या टीव्हीवर देखील हा सामना पाहू नये. तसेच काहींनी त्याला मैदानात येण्याचा प्रस्ताव देखील दिला आहे. (Amitabh Bachchan’s exclusive post about the 2023 World Cup final )
महत्वाच्या बातम्या –
Semi Final 2: कांगारूंकडून हारताच आफ्रिकेच्या हेड कोचचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘मला कसलाच फरक पडत नाही…’
World Cup 2023 Final पूर्वी मिचेल मार्शची रोहितसेनेला धमकी! म्हणाला, ‘2 बाद 450 धावा करून भारताला…’