---Advertisement---

‘कोण रूट? त्याला मुळासकट उपटून फेकू’; लीड्स कसोटीनंतर अमिताभ बच्चन यांचे ट्वीट व्हायरल

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लिश कर्णधार जो रूटने मालिकेतील तिसरे शतक झळकावत भारताच्या हातातून सामना हिसकावून घेतला. दुसरीकडे चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनीही शानदार फलंदाजी करत सामन्याच्या तिसऱ्या दिवशी संघाच्या आशा जागवल्या होत्या. पण चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजी ढेपाळली आणि संघाने एक डाव 76 धावांनी सामनाही गमावला.

या मालिकेत आतापर्यंत इंग्लिश कर्णधाराची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. जो रूटने आतापर्यंत खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये 3 शतके केली आहेत आणि त्याने या मालिकेत आतापर्यंत भारतीय गोलंदाजांना सोलून काढले आहे. दरम्यान, ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांनी इंग्लिश कर्णधार जो रूटवर केलेले जुने ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांनी 2016 मध्ये हे ट्विट केले होते. 2016 च्या टी-20 विश्वचषकादरम्यान विराट कोहलीने 51 चेंडूत नाबाद 82 धावांची शानदार खेळी करून भारताला उपांत्य फेरीपर्यंत नेले होते. यानंतर, माजी इंग्लिश कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉफने आपल्या ट्विटर हँडलवरून एका ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘जर विराट या वेगाने प्रगती करत राहिला; तर तो एक दिवस जो रूटची नक्कीच बरोबरी करेल.’

या ट्विटला उत्तर देताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले होते की, ‘कोण रूट, आम्ही त्याला मुळासकट उपटून फेकू.’

2016 साली केलेले त्यांचे ट्विट आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. परंतु कसोटी मालिकेतील जो रूटच्या धुव्वादार प्रदर्शन आणि याउलट विराट कोहलीच्या खराब कामगिरीनंतर सोशल मीडियावर अनेकांनी हे ट्विट डिलीट करण्याची मागणी केली आहे.

आता अमिताभ बच्चन यांनी जो रूटवर केलेल्या या ट्विटवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर एका युजरने लिहिले की, ‘रूटने हे ट्विट पाहिले तर नाही ना?’ अमिताभ बच्चन यांनी हे ट्विट काढून टाकावे अशी युजर्सची इच्छा आहे. कारण लीड्स कसोटीत रूटने भारतीय संघाविरुद्ध अक्षरशः कहर केला होता. लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 78 धावांवर बाद झाला. तर एकटच्या जो रूटने इंग्लंडच्या पहिल्या डावात संपूर्ण भारतीय संघापेक्षा जास्त धावा चोपल्या होत्या. त्याने 121 धावांची शानदार खेळी खेळली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडपुढे रिषभ ठरला नामोहरम, कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच केली ‘ही’ लाजिरवाणी कामगिरी

ऑली रॉबिन्सनचा कहर! भारताच्या ५ फलंदाजांना दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता, पाहा व्हिडिओ

खराब फॉर्मातील भारतीय खेळाडूंची चौथ्या कसोटीतून हकालपट्टी; माजी क्रिकेटर म्हणाले, ‘बदल आवश्यक’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---