---Advertisement---

क्रीडा पत्रकार अमोल मचाले यांना य. द. सहस्त्रबुद्धे पुरस्कार जाहीर

On: गुरूवार, जुलै 23, 2020 11:17 AM
---Advertisement---

पुणे । क्रीडा पत्रकार अमोल मचाले यांना कै. लेप्टनंट जनरल य. द. सहस्त्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रीय मंडळातर्फे दिला जाणारा यंदाचा उत्कृष्ट क्रीडा पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा मंगळवारी करण्यात आली.

४१ वर्षीय अमोल मचाले यांचे मूळ गाव शेंदूरजना घाट (जिल्हा – अमरावती) असून त्यांनी राज्यशास्त्रात एमए केल्यानंतर संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विषयात पदविका प्राप्त केली. गेली १६ वर्षे ते क्रीडापत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहेत. २००४ मध्ये त्यांनी ‘प्रभात’ या दैनिकातून पत्रकारितेचा श्रीगणेशा केला. यासोबतच ४ वर्षे त्यांनी पुणे आकाशवाणीमध्येही काम केले. यानंतर सुमारे १२ वर्षे त्यांनी पुणे ‘लोकमत’मध्ये विविध पातळीवर पत्रकार म्हणून काम पाहिले.

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर केदार जाधवने याच महिन्यात सुरु केलेल्या Inside Cricket या क्रीडाविषयक साप्ताहिकात अमोल मचाले हे व्यवस्थापकीय संपादक म्हणून सध्या कार्यरत आहेत. क्रीडा क्षेत्राव्यतिरिक्त राजकारण, कृषी आणि शिक्षण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. अलिकडे त्यांनी कोविड-१९ या विषयावर काही विश्लेषणात्मक बातम्या दिल्या होत्या. त्या लक्षवेधी ठरल्या.

वाचा- गोष्ट न्यूझीलंडच्या क्रिकेटरशी लग्न करुन त्याच देशात महापौर झालेल्या भारतीय महिलेची

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---