जेव्हा कधी देशात काही मोठी घटना घडते, तेव्हा डेअरी प्रोडक्ट्स बनवणारा ब्रँड अमूल त्या घटनेवर भाष्य करणारी जाहिरात बनवतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांचे मत सर्वापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. अमूल त्यांचे मत जाहिरात किंवा कार्टूनमधून जगासमोर मांडत असतो. सध्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे आणि क्रिकेट चाहत्यांनी सामन्यांचा आनंद घ्यायला सुरुवात केली आहे.
दरम्यान आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने घोषणा केली आहे की, हा चालू आयपीएलचा हंगाम त्याचा आरसीबीच्या कर्णधाराच्या रूपातील शेवटचा हंगाम असणार आहे. त्याच्या या घोषणेनंतर अमूलने याच पार्श्वभूमीवर एक कार्टून बनवले आहे.
विराटने १९ सप्टेंबरला घोषित केले आहे की, तो आयपीएलच्या या हंगामानंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडणार आहे. यानंतर अमूलने याच अनुषंगाने एक कार्टून तयार केले आहे. कार्टूनमध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहली खुर्चीवर बसलेला दिसत आहे. कार्टूनसोबत जे कॅप्शन लिहिले गेले आहे त्यामुळे त्याची खूप चर्चा होत आहे. अमूलने विराटच्या कार्टूनसोबत लिहिले आहे की, “सिंहासनावर नव्या रॉयलचा राज? अमूल आव्हान नसलेला नेता!”
#Amul Topical: RCB will be in search of a new captain… pic.twitter.com/ujQBiatxnR
— Amul.coop (@Amul_Coop) September 20, 2021
अमूलने तयार केलेल्या विराटच्या या कार्टूनच्या जाहिरातीची खूप चर्चा होत आहे आणि या पोस्टवर विराटच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात विराटच्या नेतृत्वातील संघ आरसीबी केकेआरविरुद्ध पहिल्याच सामन्यात पराभूत झाला आहे. तसेच या सामन्यासोबतच विराटने त्याचे आयपीएलमधील २०० सामने पूर्ण केले आहेत.
विराट सध्या भारतीय संघाचे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये (टी २०, एकदिवसीय, कसोटी) नेतृत्व केरत आहे, त्यामुळे त्याच्यावर कामाच प्रचंड ताण आहे. विराटने आयपीएल सुरू घोण्यापूर्वी आगामी टी२० विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व सोडण्याचीही घोषणा केली आहे. त्यानंतर आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच दिवशी विराटने आरसीबीचे कर्णधारपद सोडणार असल्याचेही घोषित केले आहे. असे असले तरी तो संघासोबत फलंदाजाच्या रूपात कायम राहणार आहे.
आरसीबीने शेअर केकेल्या व्हिडिओमध्ये कोहलीने याबाबत माहिती दिली होती. तो म्हणाला होता की, “ही आरसीबीच्या कर्णधाराच्या रूपात माझी शेवटची आयपीएल असेल. मी माझ्या अंतिम आयपीएल सामन्यापर्यंत आरसीबीचा भाग राहील. माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी आणि माझे समर्थन करण्यासाठी प्रशंसकांना धन्यवाद दोतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
मन में लड्डू फुटा!! डगआऊटमध्ये आरसीबीच्या खेळाडूचं सुरू होतं भलतचं काही, फोटो भन्नाट व्हायरल
विराटच्या ‘द्विशतका’ला एबीने बनवले आणखी स्पेशल, दिली खास भेट; जिवलग मित्रांचा क्षण करेल भावूक
दारुण पराभवानंतरही आरसीबीचे स्थान कायम, केकेआरला मात्र भरपूर फायदा; पाहा पाँईट टेबलची सद्यस्थिती