---Advertisement---

‘या’ क्रिकेटरची बड्डेदिनी स्वत:लाच ग्रेटभेट, शतक ठोकत मोडला मितालीचा २२ वर्षे जुना विक्रम

On: बुधवार, ऑक्टोबर 13, 2021 9:49 AM
---Advertisement---

क्रिकेटविश्वात दररोज कितीतरी जुने विक्रम मोडत असतात तर नव्या विक्रमांचीही नोंद होत असते. सध्या आयर्लंडचा महिला संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर असून उभय संघात वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना सोमवार रोजी (११ ऑक्टोबर) हरारे येथे झाला. तब्बल ८५ धावांच्या फरकाने आयर्लंड संघाने हा सामना जिंकत ३-१ ने मालिकाही खिशात घातली. ऍमी हंटर हिच्या तडाखेबाज शतकाच्या जोरावर संघाला हा दणदणीत विजय मिळवता आला. या दमदार शतकासह तिने भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज हिचा मोठा विक्रम मोडला आहे.

झिम्बाब्वेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघाने निर्धारित ५० षटकांमध्ये ३ बाद ३१२ धावा केल्या. यामध्ये ऍमीने तब्बल १२१ धावा जोडल्या. १२७ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांच्या मदतीने तिने ही अभेद्य खेळी केली. या शतकासह ती वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी सर्वात युवा महिला क्रिकेटपटू बनली आहे. विशेष बाब अशी की, तिने तिच्या १६ व्या वाढदिवशी हा पराक्रम केला आहे. या शतकासह तिने मितालीचा २२ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे.

मितालीने जून १९९९ मध्ये वयाच्या १६ वर्षे २०५ दिवसांचे असताना आयर्लंड संघाविरुद्धच पहिलेवहिले वनडे शतक ठोकले होते. यावेळी तिने नाबाद ११४ धावा फटकावल्या होत्या. तिच्यानंतर तब्बल २१ वर्षांनी एमीने हा कारनामा करत इतिहास रचला आहे. आता ती महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक करणारी क्रिकेटपटू ठरली आहे.

कौतुकाची गोष्ट म्हणजे, हा एमीचा केवळ चौथा वनडे सामना होता. याच वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातून तिने आपल्या वनडे कारकिर्दीची सुरुवात केली होती. तर स्कॉटलँडविरुद्धच्या टी२० सामन्याद्वारे मे २०२१ मध्ये तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते.

याखेरीज एमी आयर्लंडकडून वनडे शतक ठोकणारी चौथी महिला क्रिकेटपटू बनली आहे. तसेच वर्ष २००० नंतर वनडेत शतक करणारी पहिलीच आयर्लंड महिला क्रिकेटपटू बनली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जवळचा मित्र कोहलीने कॅप्टन्सी सोडल्याने डिविलियर्स भावुक; म्हणाला, ‘त्याला पाहून एकच शब्द आठवतो…’

विराट एकटा कर्णधार नाही, ‘हे’ भारतीय दिग्गजही त्यांच्या आयपीएल फ्रँचायझीला नाही बनवू शकले विजेता

खरी फ्रँचायझी! पराभवानंतर डॅन ख्रिस्चियन आणि पत्नीवर अपशब्दांचा मारा, आरसीबीची ट्रोलर्सला सणसणीत चपराक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---