---Advertisement---

लय भारी! झहीर खानच्या लग्नातील विराट-अनुष्काचा ‘तो’ फोटो होतोय भलताच व्हायरल

On: शुक्रवार, जुलै 2, 2021 5:54 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे जोडपं नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. चाहत्यांना देखील विराट आणि अनुष्काची जोडी खूप आवडते. या जोडप्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या लग्नातला विराट आणि अनुष्काचा एक फोटो सर्वांसमोर आला आहे. (An abandoned photo of Virushka came to light, which went viral on social media)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये विराट बॉलिवूडमधल्या अभिनेत्याप्रमाणे अभिनेत्री अनुष्का शर्माच्या ओढणी सोबत खेळताना दिसून आला. विराट रोमँटिक मूडमध्ये दिसत होता. तर अनुष्का एकदम आरामात स्टाइलमध्ये त्याच्यासोबत उभी होती.

झहीर खान आणि सागरिका घाटगे यांचे लग्न
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि ‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्री सागरिका घाटगे यांचे लग्न नोव्हेंबर 2017 मध्ये एका खासगी समारंभात  झाले. त्यानंतर या जोडप्याने आपल्या मित्र परीवारासाठी एक मोठी रिसेप्शन पार्टी दिली होती. झहीर खानने 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो 14 वर्ष  भारतीय संघाचा एक भाग होता. विराट आणि अनुष्काला समर्पित अनेक फॅन पेजने क्युरेट केलेली छायाचित्रे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

https://www.instagram.com/p/CQp7CUYhkop/?utm_source=ig_web_copy_link

विराट अनुष्का लोकप्रिय जोडपं
विराट आणि अनुष्काची पहिली भेट एका शाम्पूच्या जाहिरातीच्या चित्रीकरणात दरम्यान झाली. यानंतर विराट आणि अनुष्काच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर विराट-अनुष्का डिसेंबर 2017 मध्ये इटलीमध्ये खासगी समारंभात लग्न केले. विराट आणि अनुष्काचे अफेयर खूप दिवसांपासून सुरू होते. अनेक वेळा या दोघांनी यांच्या अफेअरच्या चर्चेला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते एक कठिण काम होते. लग्नानंतर त्यांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये मोठी रिसेप्शन पार्टी ठेवली होती. ज्यामध्ये बॉलिवुड आणि क्रिकेटमधील सेलिब्रिटी दिसून आले.

या जोडीला 11 जून 2021 रोजी मुलगी झाली. तिचे नाव वामिका असे ठेवण्यात आले. नवीन पाहुणी येणार असल्याची बातमी विराट आणि अनुष्काने मागील वर्षी ऑगस्टमध्ये ही बातमी दिली होती.

रब ने बना दी जोडी, पीके, बॅन्ड बाजा बारात, सुलतान आणि ऐ दिल है मुश्किल अशा चित्रपटांमध्ये अनुष्का शर्माला लोकप्रियता मिळाली आहे. निर्माता म्हणून तिचा शेवटचा सिनेमा नेटफिल्कवरील बुलबुल होता आणि तो एक चांगला चित्रपट ठरला. अनुष्का बर्‍याच काळापासून अभिनयाच्या क्षेत्रात सक्रिय नाही. तर दुसरीकडे विराट कोहलीही या क्षणी क्रिकेटच्या मैदानावर फारसा यशस्वी ठरताना दिसत नाही. अशातच काही दिवसांपुर्वीच आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

४ ऑगस्टपासून भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार असून टीम इंडियाला या मालिकेत विजेतेपद जिंकण्याची नामी संधी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
सानियाचे ‘ग्रँड कमबॅक’! विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत मिळवला विजय, मुलाने वाढविला उत्साह
जेव्हा वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला जगातील सर्वात कमजोर संघाने दाखवला होता चांगलाच इंगा
“मी अशा खेळाडूंच्या कानशिलात लगावली असती,” विश्वविजेत्या कर्णधाराची संतप्त प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---