भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना हा एक उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. या माजी डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या शानदार कारकिर्दीत अनेक सामने जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली. याशिवाय त्याच्या ऑफ स्पिनने विरोधी संघाच्या फलंदाजांनाही त्रास दिला आहे. त्याचबरोबर त्याने अनेक विक्रमही स्वतःच्या नावे केले आहेत.
रैना एक प्रतिभावान क्रिकेटपटू असण्याव्यतिरिक्त तो एक आनंदी व्यक्तिमत्व म्हणूनही ओळखला जातो. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा तो स्टार खेळाडू राहिला आहे. त्याचबरोबर रैनाने भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरशी संबंधित एक मजेदार घटना त्याच्या ‘बिलीव्ह: व्हॉट लाइफ एँड क्रिकेट टॉच मी’ या पुस्तकात नमूद केली आहे.
सन २००६ च्या त्या घटनेचा संदर्भ देत सुरेश रैनाने सांगितले की, भारतीय संघ क्रिकेट दौऱ्यासाठी विमानात गेले होते. पुस्तकात लिहिल्यानुसार, रैना आणि तेंडुलकर विमानात होते आणि बिझनेस क्लासमध्ये बसले होते. या दरम्यान, एक एअर होस्टेस सचिन तेंडुलकरकडे ऑटोग्राफसाठी आली. दरम्यान ती रैनाकडे वळली आणि त्याला सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर समजले. एअरहोस्टेस रैनाला म्हणाली, ‘हाय अर्जुन, कसा आहेस? तुझी आई कशी आहे?’
रैनाने पुढे सांगितले की, तो काही बोलण्यापूर्वी सचिन तेंडुलकरने काही खोड्या करण्याचा विचार केला. मास्टर ब्लास्टर म्हणाला की, ते दोघेही ठीक आहेत, पण अंजली त्याच्या अभ्यासावर लक्ष न दिल्याबद्दल रागावली आहे. नंतर एअर होस्टेसला तिची चूक कळली. त्याला कोणीतरी त्याच्यासोबत फोटो क्लिक करताना पाहिले. ज्यामुळे तिला समजले की, तो अर्जुन नाही तर स्वतः एक भारतीय क्रिकेटपटू आहे. नंतर एअर होस्टेस त्याच्याकडे आली आणि माफी मागितली.
दरम्यान ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना याने मंगळवारी (06 सप्टेंबर) क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती जाहीर केली आहे. रैना 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती झाला होता. आता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि देशांतर्गत क्रिकेटमधूनही तो निवृत्त (Suresh Raina To Retire From IPL) झाला आहे. त्याने स्वत: सोशल मीडियाद्वारे याबद्दल माहिती दिली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘ब्लू जर्सी’त पुन्हा एकदा धमाका करणार सुरेश रैना, तेंडूलकरच्या कॅप्टन्सीखाली करणार पदार्पण!
चेन्नईच्या लाडक्या ‘चिन्नाथाला’च्या 5 करामती, ज्यामुळे जगाने मान्य केला ‘मिस्टर आयपीएल’
Breaking: सुरेश रैनाची आयपीएलमधून निवृत्ती, संपवले बीसीसीआयसोबतचे सर्व संबंध