फुटबाॅल हा जगातील लोकप्रिय खेळांपैकी आणि सर्वाधिक खेळला जाणारा खेळ आहे. फुटबाॅलमधील अनेक स्टार खेळाडू हे जगातील अनेक खेळांच्या दिग्गजांचे प्रेरणास्थान किंवा आवडते खेळाडू बनले आहेत. पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डो या खेळाडूचे प्रचंड चाहते आहेत. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सुद्धा त्याचा खूप मोठा चाहता आहे. त्याने रोनाल्डोबाबतच्या एका प्रश्नाचे मजेशीर उत्तर दिले आहे.
विराट कोहलीला (Virat Kohli) विचारण्यात आले की, जर तो झोपेतून उठला आणि तो स्वत: रोनाल्डोसारखा (Cristiano Ronaldo) दिसला तर काय करेल? याचे उत्तर देताना विराट म्हणाला, तो सर्वात पहिल्यांदा आपल्या मेंदूचे स्कॅन करेल. आयपीएलच्या १५व्या हंगामावेळी राॅयल्स चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) फोटोशूटवेळी कोहलीने या फुटबाॅलरचे खूप कौतुक केले. यावेळी सगळे खेळाडू दिसत आहेत. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
विराट कोहलीला जेव्हा विचारण्यात आले की, त्याचा आवडता खेळाडू कोण आहे आणि तो एक दिवस त्याच्यासारखा बनून उठला, तर काय करणार? यावर कोहली म्हणाला, ‘क्रिस्टियानो रोनाल्डो’. तो आरसीबीच्या बिहाइंड द सीन सीरीजमध्ये बोलताना म्हणाला, “मी माझा मेंदू स्कॅन करेल आणि बघेन की एवढी मानसिक मजबूती कोठून येते.”
कोहली बेंगलोर संघासाठी महत्त्वाच्या क्षणांबद्दल सुद्धा बोलला आहे. त्याला विचारले असता तो म्हणाला की, “आयपीएलचा २०१६चा अंतिम सामना आणि २०१६ मधील वेस्टइंडिजविरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये खेळला गेलेला टी२० विश्वचषकाचा उपांत्य फेरीतील सामना.”
मागील एक वर्षाचा काळ विराट कोहलीसाठी खूप वाईट काळ होता. त्याने २०२१च्या शेवटी भारताच्या टी२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आणि २०२२च्या सुरुवातीलाच त्याने कसोटी कर्णधारपदाचा देखील राजीनामा दिला. सध्या तो आरसीबीचा देखील कर्णधार नाही.
आयपीएलच्या १५व्या हंगामात फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीने दोन सामने खेळले आहेत. त्यापैकी संघाला एका सामन्यात अपयश आले आहे, तर एक सामना संघाने जिंकला आहे. आरसीबी गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दीपक हुड्डा अन् केएल राहुलची मोठी झेप; टॉप-५मध्ये मिळवले ‘हे’ स्थान
IPL2022| बेंगलोर वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, ‘हे’ खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!






