ला लीगाचा बार्सिलोना विरुद्ध लास पालमस हा सामना आज बंद दरवज्यांमध्ये खेळवला जाणार आहे.
‘कॅटलन रेफरन्डम’ मुळे जे हिंसक वातावरण निर्माण झाले त्यावर ऊपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बार्सिलोनाने हा सामना रद्द करायची विनंती ला लीगा या स्पॅनिश लीगकड़े केली होती, पण त्यांनी आजच मॅच होणार असे स्पष्ट केले. मॅच जर आज झाली नाही तर बार्सिलोना संघावर ६ गुणांची पेनल्टी बसेल असे ही सांगीतले. बार्सिलोना संघ हा त्याच्या चाहतावर्गासाठी चांगलाच प्रसिद्ध आहे. आता चक्क एकही प्रेक्षक नसताना सामना खेळणं बार्सिलोनाच्या खेळाडूंसाठी किती अवघड जाईल हे ही तितकेच महत्वाचे आहे. मेस्सी-मेस्सी, गो-बरसा अश्या घोषणांची सवय असताना अचानक शुकशुकाट म्हणजे मोठी अवघड गोष्ट आहे.
विषय काय आहे :
१. कॅटलन त्याच्या स्वातंत्र्यासाठी १ ऑक्टोबर रोजी मतदान करणार होते.
२. कॅटलन हा स्पेनचा एक ईशान्य प्रांत आहे.
३. माद्रिद आणि बार्सिलोना या दोन सरकारांमध्ये मतदानामुळे वाद सुरु आहे
४. स्पेनच्या न्यायालयाने हे अवैध सांगुन यावर बंदी घातली होती.
५. बार्सिलोनाला पोलिसांनी बॅलट पेपरचे बाॅक्स बंद करुन आपल्या ताब्यात घेतले आहेत.
६. पोलिसांनी तेथील लोकांनी मतदान करण्यापासून थांबवायचा प्रयत्न केला आणि त्याला हिंसक वळण मिळाले.
नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)