टी-२० विश्वचषक २०२१ चे विजेतेपद ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले. ऑस्ट्रेलियाने रविवारी (१४ नोव्हेंबर) न्यूझीलंडला ८ विकेट्स राखून पराभूत केले आणि त्यांच्या पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. न्यूझीलंडने सुरुवातीला फलंदाजी करत मोठी धावसंख्या केली होती, पण ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे संघाने ८ विकेट्सने या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शने महत्वाची भूमिका पार पाडली. मार्शने केलेल्या खेळीनंतर त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अशातच त्याचा एक जुना व्हिडिओही व्हायरल होतो आहे.
मार्शला अंतिम सामन्यात केलेल्या त्याच्या प्रदर्शनासाठी सामनावीर निवडले गेले. मार्श फलंदाजीच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलिया संघाला जेतेपद जिंकवून दिले असले तरी, तो मागच्या काही काळापासून ऑस्ट्रेलिया संघातून बाहेर होता. त्याला टी-२० विश्वचषकापूर्वी खेळल्या गेलेल्या मालिकेसाठी संघात सामील केले गेले होते. त्यानंतर त्याला विश्वचषकासाठीही संघात कायम ठेवले गेले.
मार्शचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ त्या काळातील आहे, जेव्हा तो खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. व्हिडिओत त्याला प्रश्न विचारला गेला आहे की, मला नाही माहिती तुम्ही बाहेरच्या चर्चांवर किती नजर ठेवता. पण असे वाटत आहे की तुमच्याबद्दल नेहमी दोन प्रकारचे गट पडलेले दिसतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की, हे कशामुळे होते? यावर उत्तर देताना मार्श म्हणतो की, ‘अर्ध्यापेक्षा जास्त ऑस्ट्रेलिया माझा द्वेष करतो.’
या प्रश्नाला उत्तर देताना मार्श म्हणाला आहे की, “बहुतांश ऑस्ट्रेलिया माझा द्वेष करतो. हे पाहा, ऑस्ट्रेलिया क्रिकेटविषयी खूप उत्सुक आहे. ते या खेळावर प्रेम करतात. त्यांना वाटत की, क्रिकेटपटूंनी चांगले प्रदर्शन करावे. यात काहीच शंका नाही की, मला कसोटी क्रिकेटमध्ये खूप संधी दिल्या गेल्या आणि मी त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. पण आशा आहे की, मला या गोष्टीचा सन्मान मिळावा की, मी नेहमी पुनरागमन करतो. मला ऑस्ट्रेलियासाठी खेळायला आवडते. मला ऑस्ट्रेलियाची ग्रीन बॅगी कॅप घालायला आवडते आणि मी प्रयत्न करत आहे. आशा आहे की, एक दिवस मी त्या लोकांचे मन जिंकेल.”
Chuffed for Mitchell Marsh.
Remember this from the 2019 Ashes when @beastieboy07 asked him about how he's viewed back in Australia: "Yeah, most of Australia hate me." Probably not anymore, Mitch #T20WorldCup pic.twitter.com/REJJlI7PUL
— Vithushan Ehantharajah (@Vitu_E) November 14, 2021
व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे मार्शने अंतिम सामन्यातील प्रदर्शनानंतर अनेकांची मने जिंकली आहेत. त्याने या सामन्यात ५० चेंडूंचा सामना केला आणि ७७ धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये त्याच्या ६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त सलामीवीर डेविड वॉर्नरनेही ३८ चेंडूत ५३ धावांची महत्वाची खेळी केली आणि संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाने वॉनची ‘ती’ भविष्यवाणी ठरवली खोटी, गोलंदाज झम्पाने भन्नाट पोस्ट करत लगावली चपराक
बांगलादेश दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, ६०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाऐवजी ‘या’ बॉलरची निवड
टी२० विश्वचषकातून वगळण्याबाबत भारताच्या चहलने सोडले मौन; म्हणाला, “मला ४ वर्षे संघाबाहेर…”