माजी भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचक संजय मांजरेकर यांची कारकिर्द वादांनी भरलेली राहिली आहे. आपल्या स्पष्टपणे बोलण्याच्या वृत्तीमुळे ते सतत टिकेचे धनी ठरले आहेत. नुकतेच भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याला सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू म्हणण्यास विरोध दर्शवल्याने चाहत्यांनी त्यांना धारेवर धरले आहे. यापुर्वीही भारतीय अष्टपैलू रविंद्र जडेजा याच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टिकेची झुंबड उडाली होती.
अशातच एका अज्ञात चाहत्याने त्यांच्यासोबतच्या वैयक्तिक संवादाचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. यामध्ये मांजरेकरांनी जडेजाबद्दल पुन्हा केलेल्या भाष्यामुळे संतापलेल्या त्या चाहत्याने त्यांना ब्लॉक केले असल्याचे दिसत आहे. .
चाहत्याने शेअर केलेल्या स्क्रिनशॉटमध्ये सुरुवातीला ‘विस्डेन इंडिया’चे एक ट्विट जोडले आहे. यामध्ये त्यांनी कपिल देव आणि अश्विन याची कसोटीतील अष्टपैलू कामगिरी देत ते अजूनही सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू नाहीत का? असा प्रश्न विचारला आहे. या ट्विटला प्रत्युत्तर देत त्या चाहत्याने लिहिले आहे की, ‘आपण मांजरेकरांची वक्तव्ये इतक्या गांभीर्याने का घेतो? हेच मला समजत नाही. कारण ते फक्त त्यांच्या फालतू ट्विट आणि मतांसाठी प्रसिद्ध आहेत. ते अश्विनच्या तुलनेत १० टक्केचेही खेळाडू राहिले नाहीत.’
पुढे मांजरेकरांसोबतचे वैयक्तिक ऑनलाईन संवादाचे फोटो त्या चाहत्याने शेअर केले आहेत. यामध्ये मांजरेकरांनी म्हटले आहे की, ‘ठीक आहे. अर्थात तूसुद्धा माझ्याबद्दल काहीही बोलू शकत नाही. कारण तू माझ्या तुलनेत १ टक्केही चांगला खेळाडू नाहीस.’ यावर प्रतिक्रिया देताना चाहता लिहितो की, ‘मला तुमचासारखा खेळाडू बनण्याची इच्छाही नाही.’ पुढे मांजरेकर म्हणतात की, ‘शाब्बास, कारण मी जे काही साध्य केले आहे ते साध्य करणे खूप अवघड आहे.’
यावर संतापून चाहता म्हणतो की, ‘तुम्ही कोणत्या यशाविषयी बोलत आहात. कारण तुम्ही तुमच्या क्रिकेट कारकिर्दीत जे काही साध्य केले होते. त्याचा तुमच्या काही खेळाडूंबद्दलच्या नकोशा मतांमुळे आणि वक्तव्यांमुळे विसर पडत आहे. सध्या तुमचे पद पाहता लोक तुमच्याकडून खेळाडूंबद्दलच्या चांगल्या तथ्यांविषयी ऐकू इच्छितात. परंतु तुम्ही लोकांच्या अपेक्षांच्या विरोधात जात आहात. तुम्ही सरळ सरळ जडेजासारख्या व्यक्तीवर शाब्दिक अतिसार करत आहात.’
‘सध्या तुम्ही जडेजासारख्या खेळाडूंमधील कौशल्यांना पाहू शकत नाहीत. किंवा पाहूनही त्याकडे दुर्लक्ष करत आहात, याचे मला दु:ख वाटत आहे. जर तुम्ही त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत असाल; तर तुम्ही केलेल्या सर्व टिकांना मान्य केले पाहिजे,’ असे तो चाहता पुढे लिहितो.
This is the kind of respect he has for ppl. Coz he’s a self-centred egoistic maniac. @SGanguly99 @BCCI for your notice. This is how we fans get in response to showing our disagreement .
— soorya narayanan (@soorya_214) June 7, 2021
यावर मांजरेकर म्हणतात की, ‘तू मला तुझ्याप्रमाणे खेळाडूंची पूजा करायला सांगत आहेस. परंतु मी एक चाहता नाही. तर मी एक विश्लेषक आहे. आणि जडेजाला जास्त इंग्रजी कळत नाही. त्यामुळे त्याला बिट्स आणि पिसेस (‘बिट्स अँण्ड पिसेस’ म्हणजे थोडी फलंदाजी आणि थोडी गोलंदाजी करणारा खेळाडू) याचा खरा अर्थ माहिती नसेल आणि नक्कीच कोणीतरी त्याच्यावर तोंडी अतिसार केला असेल.’
Setting things right! One less nuisance pic.twitter.com/5Wf3dCM0Tc
— soorya narayanan (@soorya_214) June 7, 2021
मांजरेकरांच्या अशा भाष्यामुळे त्या चाहत्याच्या मनातील त्यांच्याविषयीची घृणा वाढत गेली. यामुळे त्याने इच्छा नसतानाही त्यांच्यातील संवादाचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले. यामध्ये त्याने जडेजाला पाठिंबा देत, त्याने यापुर्वी मांजरेकरांना शिकवलेला धडा, योग्यच होता असे म्हटले आहे. याबरोबरच अशा व्यक्तीला भविष्यात तुमच्या पॅनलमध्ये जागा द्याल का? असा प्रश्नही बीसीसीआयला विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम! कर्णधार अन् सलामीवीराची जोडी करतेय कसून सराव
‘ऑस्ट्रेलिया-इंग्लंड विरुद्ध चमकणारा पंत १०० कसोटी सामने खेळेल,’ अनुभवी यष्टीरक्षकाची भविष्यवाणी