भारतासाठी टोकियो ऑलिम्पिक यशस्वी ठरले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण ७ पदकं मिळाली. त्यातही शनिवारी (७ ऑगस्ट) भारतासाठी भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णमयी कामगिरी केली. त्याने पुरुषांच्या भालाफेक क्रीडाप्रकारात सर्वात लांब भाला फेकत ऐतिहासिक सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच्या या यशानंतर त्याच्यावर बक्षीसांचा वर्षाव होत आहे. महिंद्रा आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी घोषणा केली की, ते नीरजला त्याच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी XUV 700 भेट देतील.
यापुढे 7 ऑगस्ट 2021, तारीख भारतीय ॲथलेटिक्सच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली जाईल. याचे श्रेय भालाफेकपटू नीरज चोप्राला जाते. ज्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकले. तो नेमबाज अभिनव बिंद्रानंतर ऑलिम्पिक खेळांमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय आहे. त्याच्या या पराक्रमामुळे भारताची ॲथलेटिक्समधील ऑलिम्पिक पदकाची 121 वर्षांची प्रतीक्षा नक्कीच संपली.
नीरजवर लोकांनी सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यातच महिंद्रा आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी नीरजला XUV 700 भेट देण्याची घोषणा केली.
एका ट्विटर वापरकर्त्याने आनंद महिंद्रा यांना नीरजसाठी XUV 700 बद्दल विचारले. प्रत्युत्तरात, महिंद्रा समूहाच्या अध्यक्षांनी त्यास सहमती दर्शवली आणि सांगितले की, ही भारताच्या ‘गोल्डन ॲथलीट’साठी माझ्याकडून वैयक्तिक भेट असेल. एवढेच नव्हे तर, त्याने सुवर्णपदक विजेत्यासाठी कार तयार ठेवण्यासाठी त्याच्या कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना टॅग केले.
Yes indeed. It will be my personal privilege & honour to gift our Golden Athlete an XUV 7OO @rajesh664 @vijaynakra Keep one ready for him please. https://t.co/O544iM1KDf
— anand mahindra (@anandmahindra) August 7, 2021
नीरजने सुवर्णपदक जिंकल
बुधवारी (4 ऑगस्ट) पात्रता फेरीत नीरजने 86.59 मीटर भालाफेक करत सुवर्णपदकाचा दावेदार म्हणून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. विशेष म्हणजे त्याने हा विश्वास सार्थकी लावत अंतिम फेरीत सर्वात लांब भाला फेकला आणि सुवर्णपदक आपल्या नावे केले. तसेच चेक प्रजासत्ताकचे भालाफेकपटू जेकब वडलेजच (86.67 मीटर) आणि विटेझस्लाव व्हेसेली (85.44 मीटर) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या –
नीरजच्या सुवर्ण यशाचा उत्साह! “मेरे देश की धरती” गाण्यावर ७२ वर्षीय गावसकरांनी आनंदाने धरला ठेका
बुमराहचा “हा” शॉट पाहिलात का? इंग्लिश गोलंदाजही पडले बुचकळ्यात
जसप्रीत बुमराहची फलंदाजी विराट कोहलीसाठी ठरली डोकेदुखी; भारतीय कर्णधार होतोय प्रचंड ट्रोल