जगप्रसिद्ध मासिक ‘फोर्ब्स’ने नुकत्याच घोषित केलेल्या सार्वकालीन श्रीमंत खेळाडूंच्या यादीत बास्केटबॉल मायकल जॉर्डनने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याची एकूण संपत्ती १.७ बिलियन डॉलर या यादीत सांगण्यात आली आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर गोल्फर टायगर वूड्स असून त्याची संपत्तीही १.७ बिलियन डॉलरच्या आसपास आहे. २००८ साली टायगर वूड्सने मोठा विजय मिळवल्यानंतर त्याला वैयक्तिक जीवनातील घडामोडींमुळे सतत अपयश आले आहे.
सध्या तो जागतिक क्रमवारीत १,१८९व्या स्थानावर आहे. पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारा वूड्स हा एकमेव सध्या खेळत असलेला खेळाडू आहे.
दिवंगत अमेरिकन गोल्फर अरनॉल्ड पाल्मर १.४ बिलियन डॉलरसह तिसरा, माजी गोल्फर जॅक निकलास १.२ बिलियन डॉलरसह चौथा आहे.
प्रसिद्ध फॉर्मुला १ ड्राइवर आणि सातवेळचा विजेता मायकल शूमाकर १ बिलियन डॉलरसह पाचवा आहे. ४८ वर्षीय शूमाकर हा त्यावेळचा या खेळातील दिग्गज ड्राइवर म्हणून ओळखला जात असे. तो १९९०मध्ये जगातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
माजी फुटबॉलपटू डेविड बेकहॅम, अमेरिकन बॉक्सर फ्लॉइड मेवेदर, टेनिसपटू रॉजर फेडरर आणि लिओनेल मेस्सी आणि क्रिस्तिआनो रोनाल्डो ह्या यादीत स्थान मिळवू शकले आहेत.
विशेष म्हणजे या यादीत कोणताही क्रिकेटपटू स्थान मिळवू शकला नाही.
हे आहेत जगातील सार्वकालीन श्रीमंत खेळाडू
१. मायकल जॉर्डन
२.टायगर वूड्स
३.अरनॉल्ड पाल्मर
४. जॅक निकलास
५.मायकल शूमाकर
६.फिल मिकेल्सन
७.कोबे ब्रायंट
८.डेविड बेकहॅम
९.फ्लॉइड मेवेदर
१०.शाडुचीले ओनेल
११. लेब्रॉन जेम्स
१२. क्रिस्तिआनो रोनाल्डो
१३. ग्रेग नॉर्मन
१४.माइक टायसन
१५.रॉजर फेडरर
१६.लिओनेल मेस्सी
१७.अॅलेक्स रॉड्रीगुइझ
१८.जेफ गॉर्डन
१९.ऑस्कर दे ला होया
२०.मेनी पकववॊ
२१.डेरेक जेटर
२२.पेयटॉन मंनींग
२३. केविन गार्नेट
२४.एवंडेर होलीफिएल्ड
२५.आंद्रे अगासी