काल (७ एप्रिल) भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी इंस्टाग्रामवरती लाइव्ह चॅट केला. यावेळी रोहितने खुलासा केला की जेव्हा तो पहिल्यांदा भारतीय संघात आला होता, तेव्हा युवराज सिंग हा त्याचा पहिला क्रिकेट क्रश होता.
इंस्टाग्राम लाईव्हमध्ये रोहितने (Rohit Sharma) सांगितले की, “भारतीय संघात आल्यानंतर युवी माझा पहिला क्रिकेट क्रश होता. त्यावेळी मला असे वाटत होते की मी युवीची भूमिका साकारावी. ५व्या किंवा ६व्या क्रमांकावर फलंदाजीला जायचे आणि सामन्याचा शेवट करूनच परत यायचे.”
“मला नेहमी वाटायचे की मी युवराजशी (Yuvraj Singh) बोलावे. त्याच्याकडून काहीतरी शिकावे,” असेही पुढे बोलताना रोहित म्हणाला.
यावेळी बसमधील भारतीय संघासोबतचा आपला पहिला अनुभव सांगताना रोहित म्हणाला, “मला उशिर होईल याची इतकी भीती वाटत होती की मी वेळेच्या ३० मिनिट आधीच बसच्या ठिकाणी गेलो होतो.”
तसेच लाईव्हमध्ये रोहितने युवीसोबतचा पहिल्या भेटीचा किस्सादेखील शेअर केला. यावेळी बोलताना रोहित म्हणाला की, “मी चुकून युवीच्या सीटवरती बसलो होतो. तेव्हा युवी सनग्लासेस घालून लॉबीतून येत होता. त्याला बघून मी थरथर कापू लागलो. पुढे त्याने बसमध्ये चढून मला विचारले की, तुला माहिती आहे का ही सीट कुणाची आहे आणि मला उठून दुसऱ्या कोणत्याही सीटवर बसायला सांगितले. या किस्स्यामुळे आमच्यात चांगले नाते निर्माण झाले. आम्ही त्यावेळी खूप मस्तीही केली होती.”
तर युवराज पुढे रोहितविषयी बोलताना म्हणाला की, इतर युवा खेळाडूंपेक्षा रोहित मला जास्त परिपक्व वाटला होता.
रोहितने २००७मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून भारतीय संघात पदार्पण केले होते. तसेच त्याचवर्षी तो पहिल्या टी२० विश्वचषकाचाही भाग होता. त्यावेळी युवराज संघातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू होता.
एवढेच नव्हे तर, रोहितने विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पणही केले होते. या सामन्यातच युवराजने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) षटकात सलग ६ षटकार मारत संघाला अंतिम सामन्यात नेण्यासाठी मदत केली होती. तसेच, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-५ लोकप्रिय क्रिकेटर, ज्यांनी वनडेत केले आहे केवळ एक शतक
-१३ एप्रिल २०२०ला होणार जगातील सर्वात मोठा क्रिकेट सामना
-जगातील ३ असे दिग्गज फलंदाज ज्यांना वनडेत करता आले नाही शतक