---Advertisement---

१४३ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच घडला असा अनेखा विक्रम

On: मंगळवार, जुलै 28, 2020 8:57 PM
---Advertisement---

मँचेस्टर| इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात आज(२८ जुलै) पाचव्या दिवशी इंग्लंडने २६९ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच ३ सामन्यांची कसोटी मालिका यजमान इंग्लंडने २-१ अशा फरकाने जिंकली. इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटीतील विजयात स्टुअर्ट ब्रॉडने १० विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला.

याबरोबरच तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान ब्रॉडने ५०० कसोटी विकेट्स पूर्ण करण्याचाही कारनामा केला. १४० कसोटी सामने खेळताना ब्रॉडने ५०१ विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटीमध्ये ५०० विकेट्सचा टप्पा पार करणारा एकूण ७ वा गोलंदाज ठरला आहे, तर इंग्लंडचा जेम्स अँडरसननंतरचा केवळ दुसरा गोलंदाज आहे. जेम्स अँडरसनने आत्तापर्यंत  १५३ कसोटी सामन्यांमध्ये ५८९ विकेट्स घेतल्या आहेत.

त्यामुळे इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान एक खास विक्रमाची नोंद झाली. कसोटीमध्ये असे पहिल्यांदाच झाले की कसोटीत ५०० विकेट्स घेणारे २ वेगवान गोलंदाज एकाच सामन्यात एकत्र खेळले.

ह्या कसोटी सामन्यातील इंग्लंडच्या पहिल्या डावात ब्रॉडने ६ आणि दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या. तर अँडरसनला दोन्ही डावात मिळून २ विकेट्स घेण्यात यश आले.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडचा तिसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय; मालिकाही घातली खिशात

ठरलं तर: यूएई क्रिकेट बोर्ड करणार आयपीएल २०२०चे आयोजन; बीसीसीआयकडून मिळाले अधिकृत पत्र

धोनी इलेव्हन विरुद्ध विराट इलेव्हन कोण कोणावर पडेल भारी? हा खेळाडू म्हणतो…

ट्रेंडिंग लेख –

खलनायक ते नायक!

भारतीय संघातील ५ सक्रिय खेळाडू ज्यांनी खेळलाय फक्त एक कसोटी सामना

गेल्या १० वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे ५ अष्टपैलू खेळाडू….

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---